Home
Home वाशिम शिवसुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादन कंपनी इरळाच्या संकलन केंद्राचे भूमिपूजन 

शिवसुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादन कंपनी इरळाच्या संकलन केंद्राचे भूमिपूजन 

By : Ajay Gayakwad

वाशिम :
मालेगाव तालुक्यातील ग्राम इरळा येथे आज दिनांक 3 जानेवारी रोजी डॉ .पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोला व सेवा प्रदाता संस्था सर्ग विकास समिती यांचे अंतर्गत स्थापित दहा गटांचे सामूहिक प्रशिक्षण व शिवसुत्र जैविक शेती मिशनचा कंपनी च्या समहू संकलन केंद्राचे भूमिपूजन सोहळा पार पडला ह्यावेळी प्रमुख उस्थितीमध्ये मा श्री संतोष आळशे सर प्रकल्प संचालक डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोला.मा श्री प्रकाश पोहरे अध्यक्ष महासंघ जैविक शेती मिशन शे .उ . कं . अकोला. मा श्री शंकर तोटावर साहेब जिल्हा कृषी अधीक्षक वाशिम.मा श्री कुंवरसिंग मोहने सेवानिवृत्त कृषी अधिकारी अकोला ह्यांच्या सह दहा जैविक शेती गटातील शेतकरी, गटाचे अध्यक्ष व ,गटाचे सचिव मोठ्या संख्येने उपस्थिती होते.सर्वप्रथम मार्गदर्शन पर भाषांनामध्ये श्री शंकर तोटावर ह्यांनी जैविक शेतीकडे शेतकऱ्यांनी का वळावे ह्याचे महत्व पटवून दिले. त्यानंतर संतोष आळशे सर ह्यांनी जैविक शेती करताना जमिनीची कशी निगा राखणं सोप जाते व जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा ह्याची माहिती दिली. त्या नंतर प्रकाश भाऊ पोहरे ह्यांनी रासायनिक खते, कीटकनाशके ह्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचे काय वाईट दुष्परिणाम होतात ह्यावर सखोल माहिती तेथील शेतकरी वर्गाला देत जैविक शेती चे महत्व पटवून दिले.तर कुंवरसिह मोहने ह्यांनी जैविक खते,जैविक कीटकनाशके बियाणे कशे शेतकरी वर्गाने स्वतःच्या स्वतःच तयार करून वापरावे आणि आपला शेतीवरचा खर्च कसा कमी करून उत्पादन वाढवावे ह्याचे प्रशिक्षण दिले.ह्यावेळी शिवसुत्र जैविक शेती चे सर्व संचालक व अध्यक्ष प्रकाश दहात्रे ह्यांचा सह सर्व गटातील अध्यक्ष, सचिव,संचालक उपस्थित होते. तसेच श्री .शंकर शिंदे समूह व्यवस्थापक व जगन्नाथ शिरसाठ मास्टर ट्रेनर उपस्तीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकिरण शिंदे ह्यांनी केले.तसेच डॉ हेमंत देशमुख, शंकर हांगे, डीगंबर घुगे,आशिष पिंपळकर,अजिंक्य मेडशीकर सह तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here