अखेर तो बिबट वन विभागाने केला जेरबंद

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालीत एका मुलास ठार केलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागास अखेर यश आले. बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पकडण्यासाठी पिपर्डा परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात तो बिबट अडकला.
वनसडी वनक्षेत्रात जामगाव, बेळगाव गडचांदूर,निजामगोंदी,नोकारी,डवी,आदी गाव परिसरात या बिबट्याने मागील एक महिन्यापासून धुमाकूळ घातला होता
उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू ,सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे अतिशीघ्र दल, स्थानिक वन कर्मचारी या बिबटच्या लोकेशन वर ट्रॅप कॅमेरे,आणि पिंजरे ठेवण्यात आले होते आणि रात्र दिवस गटागटाने गस्त करीत होते
जनतेकडून सारखा दबाब येत होता अश्यातच आज पहाटे चारचे सुमारास पिपर्डा गावालगत ठेवलेल्या पिंजऱ्यात तो बिबट अडकला. वनकर्मचार्यानी वरिष्ठ वनधिकार्याना माहिती दिली व त्यांचे मार्गदर्शनात पुढील कारवाई करण्यात येत आहे नागरिकही मोठ्या संख्येत बिबट पाहण्यासाठी गर्दी केली होती ,तो बिबट कुठे ठेवणार हे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱयांनी दिली. हा बिबट जेरबंद झाल्याने वन कर्मचारिसह जनतेनेही सुटकेचा निश्वास सोडला
ही मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी यांचे नेतृत्वात क्षेत्र सहायक दिनेश चामलवार,वनरक्षक रवींद्र कूनघाटकर,प्रवीण बोभाटे,महादेव जाधव,करिष्मा पाचभाई, सुरेश नल्लूरवार अतिशीघ्र दलाचे वनपाल बी के पेंदोर,एस जी नगारे ,पी एम मेकेवाड चालक हंसराज दुर्गे तसेच कोरपना,गडचांदूर,पारडी उपक्षेत्रातील वनकर्मचारी तसेच जिवती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे, बल्हारशाह येथील क्षेत्र सहायक कोमल गुगलोत यांनी विशेष मोहीम राबवून यशस्वीपणे पार पाडली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *