गडचांदुरात भरचौकात चाकूहल्ल्याचा व्हिडीओ वायरल

By : Shankar Tadas
गडचांदूर : भर दुपारी आणि तेही गजबजलेल्या चौकात चाकूहल्ला होताना गडचांदूरकरांनी प्रथमच पाहिले असावे. कारण औद्योगिकीकरण वाढले असले तरी असली गुन्हेगारी येथे सहसा दिसून येत नाही. प्राप्त माहितीनुसार, गडचांदूर आणि नांदाफाटा येथील दोन युवकांचे घरगुती वादातून भांडण झाले. त्यात एकाने चाकूने हल्ला चढविला. दरम्यान वाचवा.. वाचवा म्हणून अनेकजन ओरडू लागले. तिथं एक बाईकस्वार आल्याने अनर्थ टळला. ही घटना 26 डिसेंबर रोजी दुपारी महात्मा गांधी शाळेजवळ घडली. या घटनेचे दोन व्हिडीओ वायरल झाले. गडचांदूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून एक युवक या चाकूहल्ल्यात जखमी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here