आम्ही पिरकोनकर समूहातर्फे रंगोत्सव 2023 चे आयोजन

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 21 डिसेंबर 2022 समाजात चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर आदि कलांना प्रोत्साहन मिळावे. विविध कलागुणांना वाव मिळावा,नागरिकांमध्ये विविध कौशल्ये विकसित व्हावीत या अनुषंगाने उरण तालुक्यातील आम्ही पिरकोनकर समूहातर्फे रंगोत्सव 2023 चे आयोजन रविवार दि.22/1/2023 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल पिरकोन येथे करण्यात आले आहे.

रंगोत्सव 2023 अंतर्गत चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थी, नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही पिरकोनकर समूहातर्फे करण्यात आले आहे. नावनोंदणी करण्याचा अंतिम तारीख 15/1/2023 असून लहानगट , मध्यमगट, मोठा गट, खुला गट या वयोगटात ही स्पर्धा संपन्न होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावे.
चेतन गावंड – 9819759105,
तुषार म्हात्रे – 9820344394,
गिरीश पाटील -9870429677

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here