हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा (कार्यक्षेत्र भारत )यांचे दिनदर्शिका प्रकाशन व कार्यकारणी नियुक्तीचा कार्यक्रम

हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा (कार्यक्षेत्र भारत )यांचे दिनदर्शिका प्रकाशन व कार्यकारणी नियुक्तीचा कार्यक्रम

लोकदर्शन नागपूर 👉 गणेश पुरी

हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा नागपूरचा,कार्यक्रम 24 डिसेंबर रोजी 11:00 वाजता शिक्षक सहकारी बँक आडोटोरियम गांधी सागर महाल नागपूर. येथे होणार आहे.
नागपूर जिल्हाध्यक्ष श्री गणेश एस .पुरी यांनी ही माहिती दिली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री योगेशजी बन यांच्या नेतृत्वात व हिंदू रक्षा समिती महाराष्ट्र महिला अध्यक्ष / विदर्भ अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात येणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व्यंकटेश जी पुरी व कपिल मुनी सर राष्ट्रीय अध्यक्ष उर्मिलाताई भारती मॅडम, मेघाताई भारती मॅडम, राष्ट्रीय अध्यक्ष, आखाड्याचे पदाधिकारी मार्गदर्शन करतील व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर आमदार रामदासजी आंबेडकर तसेच इतर मान्यवर उपस्थित राहतील. या कार्यक्रमांमध्ये गोसावी समाजाचे 500 पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. यावेळी प्रत्येक कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे आणि 2023 चे कॅलेंडर चे वाटप होणार आहे. याचप्रमाणे माननीय कृष्णदेव गिरी सर यांचे ध्याना कडून ज्ञानाकडे या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच कुमारी साक्षी गिरी यांचे शिव व्याख्यान होणार आहे.
आपला स्नेहांकित.
गणेश पुरी. जिल्हाध्यक्ष
मो. नं 9860431981

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here