इन्फंट कान्व्हेंट येथे टॅलेंट शो : विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कलाविष्कार.

लोकदर्शन 👉 मोहांन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांकरिता टॅलेंट शो चे आयोजन करण्यात आले. यामाध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलाविष्काराचे सादरीकरण केले. यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या गीत, संगीत, नृत्य वेशभूषा अशा विविध कलाविष्काराचे सादरीकरण केले.
या प्रसंगी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक रफिक अन्सारी, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, सीबीएसई प्रभारी विद्या चौधरी, वर्ग शिक्षका शोभा मॅडम, निषा वानखेडे, संगीत शिक्षक विजय डोंगरे, नृत्य शिक्षक श्रीनिवास आरेवाई यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन मयुरी पडवेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here