



लोकदर्शन-मुंबई प्रतिनिधी👉:
गुरुनाथ तिरपणकर
लालबाग विभागातील मेघवाडी येथील उपक्रम राबविणा-या “श्री म्हसोबा मंदिर समिती”या सरकारमान्य संस्थेच्यावतीने “मी आदिवासी ग्रुप”मुंबई यांच्या सहकार्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरीवली येथील गरीब आदिवासी कुटुंबियांना नुकताच दिवाळी निमित्त मोफत फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाल.या स्तुत्य उपक्रमाला मेघवाडीतील रहिवाशी,देणगीदार,हीतचिंतक यांजकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या फराळ वाटप कार्यक्रमात नरेंद्र कुडतरकर,गिरीश साळवी,किशोर सावंत,योगेश जाधव,रवींद्र भोसले,अक्षय माळकर,दीपक चव्हाण,चंद्रशेखर राणे,सचिन शेर्लेकर,रमेश राणे,रवींद्र(बाबा)पवार,श्याम देसाई,स्वप्नील मोरे,कुणाल आंगणे,कृष्णकांत राणे,चेतन तेंडोलकर,सतीश साळवी,प्रमोद चव्हाण,मंगेश साटम,जगदीश नलावडे आदी मान्यवर सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.