दिवाळी लॉटरी तिकीटांचे राज्यभरात आकर्षण!

 

लोकदर्शन मुंबई 👉-गुरुनाथ तिरपणकर

मुंबई दि २०ऑक्टोंबर २०२२ मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणामध्ये सुरू झालेल्या दिपावली भव्यतम सोडतीची विक्री प्रदर्शन स्टॉलमूळे मंत्रालयात येणार्‍या राज्यभरातील पाहुण्यांमध्ये दिवसेंदिवस लॉटरीचे आकर्षण वाढत चालले असून आता गावाखेडयातील ग्राहक हे महाराष्ट्र राज्य लॉटरीची मागणी करून नशिब आजमावून बघत आहेत!

मंत्रालयात राज्यभरातील हजारों गावकरी रोज कामानिमित्याने भेटी देतात. त्यात मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिपावली भव्यतम सोडतीबद्दल आकर्षण व उत्सुकताही वाढत चालली आहे. महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडतीचे पहिले सामायिक बक्षीस हे १करोड़ आहे तर प्रोत्साहनपर बक्षिसे ही२ लाखांची चार आहेत. दुसरी बक्षिसे पाच लाखाची पाच, तिसरी एक लाखाची पाच अशी अनेक बक्षिसे या निमित्ताने जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे ही खरोखरच भव्यतम दिवाळी ठरणार असल्याचे लॉटरी विक्रेत्यांचे नेते विलास सातार्डेकर यांनी सांगितले. ग्राहकांनी विक्रमी लॉटरीची खरेदी करावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
१ करोड दिवाळी भव्यतम लाॅटरीची तिकीटे घरपोच
महाराष्ट्र राज्य लाॅटरीचे भव्यतम सोडतीचे तिकीटे घरपोच(Home Delivery) महाराष्ट्रभर पोस्टाने पाठविण्याची खास यंत्रणा महाराष्ट्र राज्य लाॅटरी संघटनेचे सहचिटणीस राजेश बोरकर यांनी उभी केली आहे एक कोटी भव्यतम सोडतीसह अनेक आकर्षक रोख बक्षिसे यात असून प्रत्येकी 200 रूपये असा तिकीटाचा दर आहे. किमान 5 तिकीटे खरेदी करावी म्हणजे 1000/-गुगल पे केल्यास पोष्टाने तिकीटे घरपोच मिळणार आहेत
ज्या ग्राहकांना घरपोच लॉटरी तिकिटे हवी असतील त्यांनी 9004471885
Gpay No. 8928412258(कमलेश विश्वकर्मा)

या क्रमांकावर आधिक माहितीसाठी संपर्क साधावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य लॉटरी संघटनेतर्फे सहचिटणीस राजेश बोरकर यांनी केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *