आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते ८ कोटीच्या रस्ते निर्माण कार्याचे भूमिपूजन. देवाडा ते कवडगोंदी ते भेंडवी रस्त्याच्या कामाला सुरुवात

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने देवाडा ते कवडगोंदी व कावडगोंदी ते भेंडवी या रस्त्याच्या निर्माण कार्यासाठी ८ कोटी रुपये निधी मंजूर झाला. या विकासकामांचा भुमिपूजन सोहळा ग्रा प देवाडा फाटा सिद्धेश्वर येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडला. यात महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चंद्रपूर वार्षिक नियोजन सन २०२१-२२ अंतर्गत देवाडा ते कवडगोंदी (मौजा सावंगी सातेफळ नेर बाभूळगाव काळव राळेगाव वळकी मार्डी वाणी चारगाव कुरई अनंतगाव चांदूर देवाडा रस्ता (रा.मा.३१७) कि.मी. २३५/९०० ते २३७/०० व २४२/२०० ते २४४/१५० मध्ये सुधारणा करणे. ) ३ कोटी ५० लक्ष आणि कावडगोंदी ते भेन्डावी (मौजा सावंगी, सातेफळ, नेर, बाभूळगाव, काळव राळेगाव वळकी मार्डी वाणी चारगाव कुरई अनंतगाव चांदूर देवाडा रस्ता (रा.मा.३१७) कि.मी. २३७/०० ते २४४/१५० मध्ये सुधारणा करणे.) ४ कोटी ५० लक्ष पर्यंतचे डांबरीकरण रस्त्याचे सुधारणा करणे. या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी जेष्ठ नेते हमिदभाई, शंकर बोंकुर, माजी सभापती मुमताज जावेद, माजी उपसरपंच राधेश्याम कुरमावार, माजी उपसभापती अब्दुल जमीर, उपसरपंच अब्दुल जावेद, भगवान हरणधरे, ग्रा. प. सदस्य लक्ष्मीबाई कुरमावार, रुपाबाई कुलसंगे, सतय्या पाकावार, नागन्ना चेनमेनवार, विलास शेंडे, शंकर मडावी, शिवा बोंकुर, जहिर शेख, संतोष जिटानवार, संतोष आत्राम, बालाजी दंडेवार, राजू यापलवार, प्रभाकर चेनुरवार यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *