शेटफळे येथे गावातील विधवा महिलाची खणा-नारळाने ओटी भरून हळदी कुंकवाचा मानाचा मोठा सोहळा पार पडला.

लोकदर्शन👉राहुल खरात

*शेटफळे दि.१४ ऑक्टोंबर (ता.आटपाडी) येथे गावातील विधवा महिलाची खणा-नारळाने ओटी भरून हळदी कुंकवाचा मानाचा मोठा सोहळा पार पडला. यावेळी विधवा अनिष्ट प्रथेला गावातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकरी आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे क्रांतीकारक पाऊल टाकत कायमची मुठमाती दिली. यावेळी व्यासपीठावरच ओटी भरलेल्या अनेक विधवा महिलांच्या अश्रुचा बांध फुटला. शेटफळे ता.आटपाडी हे मोठ्या संख्येने जाहीर व्यासपीठावर गावातील शेकडो महिलांनी विधवांची ओटी भरणारे आणि हळदी कुंकवाचा मान परत देणारे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. विधवा प्रथा बंदीचा शासनाने कायदा केला आहे. त्याप्रमाणे शेटफळे ग्रामपंचायतीने मासिक बैठकीत आणि ग्रामसभेत ठराव घेतला होता. विधवा महिला विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा लतादेवी बोराडे यांची ज्येष्ठासोबत बैठक घेऊन प्रबोधन केल. तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रबोधन केल. या चळवळीत बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्राथमिक व माध्यमिक शिक्षीका यांना सोबत घेऊन गावात सकारात्मक वातावरण तयार केले. प्रत्येक घारा घरात विधवा महिला अनिष्ट प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याची मोहीम पोहचली. संपूर्ण गावातूनच अनिष्ट विधवा प्रथेला कायमचे हद्दपार करण्याचा संकल्प केला. त्याप्रमाणे विधवा विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा लतादेवी बोराडे आणि सुवर्णा पाटील यांच्या उपस्थितीत ग.दी. माडगूळकर स्मारकामध्ये विधवांची ओटी भरत हळदीकुंकवाचा मोठा कार्यक्रम घेतला. याला सरपंच सुप्रिया गायकवाड, उपसरपंच विजय देवकर उपस्थित होते. लतादेवी बोराडे, सुवर्णा पाटील एस.एस.गायकवाड आणि प्रा.सी.पी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील चाळीसवर विधवा महिलाची ओटी भरून हळदी कुंकू लावले. यासाठी गावातील दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या. मुद्दे-*विधवा प्रथा कायमची बंद करण्याची महिलांनी शपथ घेतली. * विधवा शब्दाऐवजी सक्षम महिला शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. *हळदी कुंकवाचया कार्यक्रमात विधवांच्या अश्रूचे बांध फुटले. * यापुढे विधवा महिलानी कायमस्वरूपी सौभाग्य लेणी आणि हळदीकुंकू लावण्याचा निर्णय घेतला.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *