महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमी व विद्या मंदिर येथे गांधी जयंती साजरी

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी स्कॉलर्स अकॅडमी व महात्मा गांधी विद्या मंदिर,गडचांदूर च्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ रश्मी भालेराव होत्या,प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी मुख्याध्यापक मोहन गव्हाणे होते,या स्पर्धेत 11 मुलांनी भाग घेतला कुमारी सुचिता देरकर आणि कुमारी समता नेमनवार यांनी महात्मा गांधीजींचे भजन गाऊन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला .श्री गव्हाणे व सौ भालेराव यांनी मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचे संचालन कुमारी समता नेमनवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी लीना बोडे यांनी केले या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक ,शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *