श्रीया फाऊंडेशन तर्फे नोकरी विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

 

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 6 ऑक्टोंबर उरण पूर्व विभागातील तरुणांसाठी कॉमन सर्विस सेंटर (CSC) व श्रीया फाऊंडेशन पाले यांच्या वतीने सरकारी नोकरी, महाराष्ट्र पोलीस भरती व सरळसेवा भरती पूर्व प्रशिक्षण यांचे मार्गदर्शन शिबीर श्रीया अकॅडेमी, कोप्रोली चौक, कोप्रोली येथे रविवार दिनांक 9/10/2022 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. सुशिक्षित तरुणांनी गोडाऊनच्या नोकऱ्यांमध्ये आपले शिक्षण, करियर वाया न घालवता सरकारी नोकरी कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. उरण पूर्व विभागात प्रथमच सरकारी नोकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जी काळाची गरज आहे. मार्गदर्शन करण्यासाठी सलग 9 वर्ष भारताचे प्रतिनिधित्व केलेले प्रसिद्ध अँथलेटिक्स, पोलीस सबइन्स्पेक्टर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. हे मार्गदर्शन सर्वांना मोफत आहे.तरी जास्तीत जास्त तरुणांनी व पालकांनी या सरकारी नोकरी मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. कृपया मर्यादित जागा असल्यामुळे अगोदर फोन करून आपली जागा पक्की करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा :- CSC सेंटर, श्रीया अकॅडमी, आधार नोंदणी केंद्र, युनियन बँके जवळ, कोप्रोली-उरण. फोन नंबर -9004763339, 9892159495, 9930253174

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *