प्रियदर्शनी हायस्कूल पारडी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – प्रियदर्शनी हायस्कूल पारडी येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा मोहितकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी चित्रकला गायन निबंध वकृत्व आदी स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्यात. यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डांगे,
संचालन मरापे,लांडे तर आभार भोंगळे यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here