विदर्भ महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य ध्वजारोहण व विविध कार्यक्रम संपन्न.*

लोकदर्शन👉 प्रा. गजानन राऊत
9767584069

श्री वेंकटेश बहुउद्देशीय संस्था गडचांदूर द्वारा संचलित विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स जिवती.येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एच. शाक्य यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री दिवंगत स्वर्गीय श्री. विलासरावजी देशमुख आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री. नामदेवरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिननिमित्त आदरांजली चा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच सन्माननीय श्री. चिडे सर तहसीलदार जिवती यांच्या हस्ते महाविद्यालयात वृक्षारोपण करून, महाविद्यालयातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना निवडणुकीकरिता आपले नाव नोंदवून त्याला आधार कार्डशी नोंदणी करण्याकरिता प्रक्रिया समजावून स्वातंत्र्या संबंधी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर *भारतीय स्वातंत्र्य चळवळ* या विषयावरती वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्वातंत्र्य प्राप्ती साठी केलेल्या देशभक्त, क्रांतीकारी यांच्या कार्य व कर्तृत्वावर आपले विचार मांडले. सोबतच स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व क्रांतिकारक देशभक्तांना आठवण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. या स्पर्धेत साईराम जाधव प्रथम, ऐश्वर्या पोळे द्वितीय, मिथुन आडे तृतीय हे विजयाचे मानकरी ठरले यांचा पाहुण्याच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आपल्याच परिसरातील श्री. दिपक चटप यांना ब्रिटिश शासनाची बेचाळीस लाखाची चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळविण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला. त्याकरिता त्यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. दीपक महाराज पुरी, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव श्री. मोहन भारती, सदस्य श्री. विठ्ठल महाराज पुरी, श्री. रंगनाथजी देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. तर वक्तृत्व स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून मुसने मॅडम बालाजी हायस्कूल जिवती, व गजानन गायकवाड यांनी उत्तम रित्या कार्य पार पाडले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील प्रा. तेलंग, प्रा. देशमुख, प्रा. लांडगे, प्रा. साबळे, प्रा. मस्कले, प्रा.मुंडे, प्रा. मंगाम, प्रा. वासाडे यांनी परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राऊत यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. पानघाटे यांनी मानले.

प्रा. गजानन राऊत
9767584069

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *