जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्युत केंद्र येथे ध्वजरोहना चा कार्यक्रम उत्साहात साजरा

 

लोकदर्शन👉सिद्धार्थ गोसाई
चंद्रपुर :-

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आज दिनांक १५ऑगस्ट २०२२ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्युतकेंद्र येथे ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला . स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या वती ने ग्रुपच्या अध्यक्षा सरिता मालू,सदस्य श्री करण कोटगिरी. तथा सौ सीमा वनकर यांनी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना छत्री, टी शर्ट, बुक्स वाटप करण्यात आले.
तसेच या प्रसंगी याच शाळेचा विध्यार्थी व नेहमी शाळेला मद्दत करणारा रोशन राधे:शाम बाथम हा बि काॅम ला ९१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल सरीता मालू मुख्याध्यापीका सौ सरोज चांदेकर ,शा.व्य.स.अध्यक्ष श्री खुशाल पाल ,स.शिक्षिका कु.लिला प्रल्हाद मेश्राम , श्री करण कोटगिरी ,सीमा वनकर यांनी अभिनंदन करीत शाल, टी शर्ट, छत्री व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सरोज प्रकाश चांदेकर तथा आभार कु.लिला मेश्राम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सिद्धार्थ गोसावी ,श्री प्रकाश चांदेकर,सौ उज्वला मानकर,पालक,गावकरी व विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले. विशेष म्हणजे बिबटाच्या दहशती मुळे वनविभागाने तिनही दिवस येथिल शिक्षकाना सरक्षण दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here