हर घर तिरंगा अभियानांतर्गत उरण शहरात तिरंगा रॅली.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि १२ऑगस्ट
उरण नगरपरिषदेच्या माध्यमातून आयोजित घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत उरण तहसील कार्यालय, पोलीस ठाणे उरण तसेच उरण पंचायत समिती यांच्या संयुक्त विदयमाने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उरण नगर परिषदेने उरण पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय, पंचायत समिती यांच्या संयुक्त विदयमाने उरण मधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी तिरंगा यात्रा आयोजित केली होती. सदर यात्रेचा उद्देश घरोघरी तिरंगा या उपक्रमाबद्दल जनजागृती व्हावी हा होता. सदर कार्यक्रमात एन. आय. हायस्कूलचे त्यांच्या एनसीसी व स्काऊट सह १०० विद्यार्थी, जे.एम. म्हात्रे शाळेतील ३० विद्यार्थी, उरण नगरपरिषद शाळा क्र. १, २ व ३ चे मिळून ५० विद्यार्थी, रोटरी इंग्लिश मेडियम चे १०० विद्यार्थी, सिटीझन हायस्कूलचे १५० विद्यार्थी, सेंट मेरी उरण शाळेचे १०० विद्यार्थी, केडीएस कॉलेज एनएसएसचे १०० विद्यार्थी तसेच ८ प्रोफेसर, उरण बचत गटाच्या २० महिला, ७ ट्रॅफिक पोलीस, उरण पोलीस स्टेशन ३० पोलीस,श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेचे पदाधिकारी सदस्य या सर्वांचा एकूण समावेश होता. सदर यात्रेचा रूट पेन्शनर्स पार्क ते उरण राजपाल नाका,पालवी हॉस्पिटल, उरण कामठा रोड,एन. आय. हायस्कूल ते उरण नगर परिषद कार्यालय उरण असे होते.यावेळी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, नगरसेवक रवीशेठ भोईर,नगरसेवक राजू ठाकूर,नगरसेवक कौशिक शहा, नायब तहसीलदार नरेश पेडवी, उरण पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण,श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा संगीता ढेरे, उरण नगर परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालयचे अधिकारी व कर्मचारी वर्ग, फायर ब्रिगेडचे अधिकारी कर्मचारी वर्ग,शाळा, महाविद्यालयचे शिक्षक विद्यार्थी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रॅलीचा उरण नगर परिषदेच्या कार्यालयाच्या आवारात समारोप झाला. तत्पूर्वी सामूहिकरित्या वंदे मातरम गीत गाण्यात आले.उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी घरोघरी तिरंगा या अभियाना बद्दल माहिती दिली व सर्वांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. उपस्थित सर्वांचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *