शेतकरी संघटना, भाजप चे शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

शेतकरी संघटना, भाजप चे शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत उपरवाही आणि परिसरातील शेतकरी संघटना आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेसचा दुप्पटा देऊन त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
या प्रसंगी अभय जवादे, धनराज पिंपळशेंडे, मुकेश पिंपळशेंडे, अनिल बावणे, आशिष बावणे, आशिष जवादे, भुषण घुंगरूड, मंगेश येलादी, अमर बिलोणे, मिथुन क्षिरसागर, अनिल मेश्राम, सुरज वडकी, पंढरी निखाडे, आकाश सोमलकर, रवी कोटांगे, अक्षय काकडे, संजय काकडे, ओम धोबे, शंकर गुरूगुंटावार, शुभम वडकी, प्रवीण कुंटलवार, सुनील भोयर, चंदु दुरटकर, मनोज कानारकर यासह शेकडोंच्या संख्येने शेतकरी संघटना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
या प्रसंगी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, कार्याध्यक्ष एजाज अहमद, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष संतोष गटलेवर, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मंगेश गुरणुले, तालुकाध्यक्ष ईरशाद शेख, शहराध्यक्ष अशोक राव यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *