ईरशाद शेख यांची राजुरा युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदा

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ट राहून मा. सोनिया गांधीजींचे हात बळकट करण्याकरीता आणि महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस प्रदेशाअध्यक्ष मा. कुनाल राऊत व प्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस भा. मितेंद्र सिंह यांचे मार्गदर्शनात कॉंग्रेस पक्षाचे संघटन वाढविण्याकरीता मोलाचे सहकार्य केल्याबद्दल, आजपर्यंतचे अनुभव व वाटचाल लक्षात घेता पुढील काळात कॉंग्रेस पक्ष संघटन वाढीकरीता मोलाचे सहकार्य अपेक्षीत राहिल असा आशावाद व्यक्त करीत चंद्रपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी विहिरगावचे माजी उपसरपंच तथा काँग्रेस कार्यकर्ते ईरशाद शेख यांची राजुरा युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, धनराज चिंचोलकर, प्रणय लांडे, उमेश गोनेलवार यासह अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here