चाईल्ड केअर तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप.


लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 30 जुलै
चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड ही सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष अन्न धान्य, शैक्षणिक साहित्य, मास्क,सॅनिटायझर, लहान मुलांना खाऊ, आदिवासीवाड्या मध्ये कपडे, फटाके, जीवन उपयोगी वस्तू वाटप करत आहे.तसेस रक्तदान शिबीर, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, अनेक शाळेत वाढते वय या विषयावर वक्तृत्व अभियान स्पर्धा आणी मार्गदर्शनपर कार्यक्रम संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली चालू आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करळ येथे मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप तसेच विविध श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचे विशेष सन्मान करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, ग्रुप ग्रामपंचायत करळ-सावरखार सरपंच विश्वास तांडेल, महाराष्ट्र भूषण-समाज सेवक राजू मुंबईकर , वाहतूक सेना तालूका उपाध्यक्ष- कु कुणाल पाटील, करळ ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष निलेश तांडेल, करळचे सामाजिक कार्यकर्ते वसंत तांडेल, चाईल्ड केअर चे संस्थापक,अध्यक्ष- विकास कडू, युवा आगरी सेना उरण अध्यक्ष -कु देवेंद्र तांडेल,अभिनेते विनायक म्हात्रे तसेच संस्थेचे सदस्य विक्रांत कडू, नरेंद्र घरत,देवेंद्र तांडेल, विश्वनाथ घरत, आमोल डेरे, विपुल कडू, धीरज घरत आणि विवेक कडू हे उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचे स्वागत संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू यांनी पुष्पगुच्छ आणी तुळशीचे रोपटे देऊन केले.तसेच कार्यक्रमाप्रसंगी वकिल दांपत्य निलेश तांडेल / जुलेखा तांडेल , यूट्यूब फेम फेमस जोडी नरेंद्र घरत, भाग्येश्री घरत, लोकप्रिय गायक प्रकाश तांडेल, प्रसिद्ध लेखक / दिग्दर्शक/अभिनेता दिगंबर कोळी याचे मान्यवरांच्या हस्ते विशेष सम्मान करण्यात आले.मान्यवरांनी आपले मनोगत मांडले.

“चाईल्ड केअर ही संस्था जवळq जवळ 6/7 वर्ष खूपच चांगल्या पद्धतीने समाज उपयोगी कार्य करत आहे.विशेष म्हणजे शैक्षणिक साहित्य वाटप हे त्यांचे मुख्य कार्य आहे. या संस्थेने आज पर्यंत कोविड काळात अनेक आदिवासी वाड्यामध्ये समाज उपयोगी वस्तू वाटप केल्या आहेत. पुढे ही या संस्थेचे भविष्यात एक मोठ्या वट वृक्षात रूपांतर होणार हे निश्चित आहे. या संस्थेला मी निश्चित मदत करीत राहीन.”
– वैजनाथ ठाकूर
माजी जिल्हा परिषद सदस्य

 

“जिल्हा परिषद शाळेत आज जी मुलांची समस्या आहे ती आज चाईल्ड केअर सामाजिक संस्था सारख्या चांगल्या संस्था आहेत त्यामुळे समस्याच राहणार नाही. ही संस्था अनेक वर्ष अनाथ आश्रम, आदिवासी वाड्यात, झोपडपट्टी, जिल्हा परिषद शाळां मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करत आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे”
– महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर

 

“चाईल्ड केअर सामाजिक संस्थे चे कार्य खूप छोटे आसले तरी ते खूप महान आहे. ते विशेषतः शैक्षणिक विषयात हाथ घालताना दिसतात. त्यांच्या कार्यात मी कधीही सहभागी होणे पसंद करेन.चाईल्ड केअर सामाजिक संस्था ही नेहमी लहान मुले, आदिवासी वाड्यात, अनाथ आश्रम मध्ये काम करत आली आहे या संस्थे ला मी कधीही कुठलेही मदत करण्यास तयार आहे”
– वसंत तांडेल, सामाजिक कार्यकर्ते,करळ

 

कार्यक्रमाचे प्रास्तविक करळ शाळेचे शिक्षक सुनील पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे निवेदन उरण मधील प्रसिद्ध निवेदक विवेक पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विकास कडू यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here