मृतक साहीलच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहा्यता निधीतून आर्थिक मदत द्यावी…..

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राजुरा :- राज्यात नुकत्याच झालेल्या पावसाने कहर करून सोडला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असता शहरी भागासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले होते. सततच्या पावसामुळे धरण, तलाव, नदी, नाले तुटूंब भरल्याने पुरस्दृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, अश्यातच गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव या गावाला सुद्धा पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने गावाला बेटाचे स्वरूप निर्माण झाले होते. परिणामी गावाचा शहराशी संपर्क तुटल्याने येण्या जाण्याचे संपूर्ण मार्ग बंद झाले होते. अशा बिकट परीस्थितीत तोहोगाव येथील साहिल कालिदास वाघाडे या १८ वर्ष वयाचे मुलास मेंदूज्वर झाला. मेंदूज्वराने पच्छाळलेल्या साहिलला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते परंतु रुग्नाची परिस्थिती पाहता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्नाला तात्काळ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. या संकटकाळात गावातील नागरिकांसह पोलीस व महसुल विभाग वाघाडे कुटुंबाच्या मदतीला धावून आले. लाकडी नावेच्या सहायाने पुराचे पाणी ओलांडत गाव गाठले अनेक संकटातून मार्ग काढत कान्हारगाव अभयारण्य मार्गे साहिलला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथून त्याला उपचारासाठी नागपुर येथे हलविणयात आले परंतु पूरपरिस्थितीमुळे उपचारास उशीर झाल्याने त्याचे निधन झाले. एकुलता एक मुलगा वृद्धापकाळातील आधारवड हरपल्याने वाघाडे कुटुंबियांवर संकट कोसळले आहे. आई वडिल गरीब असून मोलमजुरी काबाकष्ट करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाकीची आहे. पालनपोषण करण्यास कुटुंबात कोणीही नाही.
साहिल कालिदास वाघाडे यांचा मृत्यू पूर परिस्थितीने निर्माण झालेल्या नैसर्गीक आपप्तीमुळेच झाला असल्याने वाघाळे कुटुंबाला *“मुख्यमंत्री सहाय्यता निधी”* अंतर्गत आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे,
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here