जानराव यु एफ (माढा ) रीपब्लिकन एंप्लॉयीज फेडरेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी जानराव यु एफ यांची फेरनिवड

 

लोकदर्शन👉राहुल खरात
============

दिनांक ८ जुलै
माढा येथील सेवानिवृत्त जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक जानराव यु एफ यांची रीपब्लिकन एंप्लॉयीज फेडरेशन तथा रीपब्लिकन कर्मचारी महासंघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.
ऱीपब्लिकन एंप्लॉयीज फेडरेशन म्हणजे शासकीय निमशासकीय संघटीत असंघटित कर्मचारी कामगार आणि अधिकारी यांच्या न्यायहक्कासाठी लढणारे संघटन आहे या संघटनेचे नेतृत्व नामदार रामदास आठवले हे करीत असुन ते फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नामदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार फेडरेशनचे केंद्रीय सरचिटणीस आत्माराम पाखरे यानी मुबंई येथील रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रधान कार्यालयात जानराव यु एफ याना जिल्हाध्यक्षाच्या नियूक्तीचे पत्र दिले आहे जानराव यु एफ हे गेल्या २० वर्षापासुन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असुन प्रभावीपणे प्रामाणिकपणे एकनिष्ठतेने कार्यरत असल्यामुळे त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे यु एफ जानराव हे आर पी आय चे जेष्ठ कार्यकर्ते प्रबुद्ध साहित्यिक कवी असुन विविध सामाजिक संघटनाशी सलोख्याचे संबंध असुन फुले आंबेडकरी चळवळीत ते सतत सक्रिय असतात .
प्रबुद्ध साहित्य परिषदेचे ते जिल्हाध्यक्ष असुन दी पीपल्स वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टचे ते सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत .
या निवडीप्रित्यर्थ त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here