हरदोन सोसायटीवर काँग्रेस – सेना युतीचा झेंडा.

 

लोलदर्शन 👉मोहन भारती

अध्यक्षपदी विजय मडावी तर उपाध्यक्षपदी दिलीप लांडे.

राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा हरदोना सोसायटीच्या आज घेण्यात आलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूकीत काँग्रेस व सेना युतीने आपला झेंडा फडकविला असून येथे अध्यक्षपदी विजय भाऊराव मडावी तर उपाध्यक्षपदी दिलीप बाबुराव लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी हरदोना सोसायटीचे काँग्रेस – सेना युतीचे विजयी संचालक वासुदेव चाफले, मोरेश्वर पिपंळकर, दिनेश घोरपडे, महादेव भसारकर, श्यामराव आत्रण, शंकर तुमराम, देवराव तोडासे, जंगु पाटील तालांडे, जगुबाई मेश्राम, लिलाबाई पेंदोर, कमलाबाई आत्राम यांनी पाठिंबा देऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना बिनविरोध निवडून दिले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जेष्ठ नेते शंकर गोणेलवार, आदिवासी नेते श्यामराव कोटनाके, जंगू येडमे, आत्माचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, दिलीप डोईफोडे, अभिषेक गोरे, इर्शाद शेख, मारोती बोढेकर, संजय मेश्राम, संदीप घोटेकर, रामदास आत्राम यासह अनेकांनी आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहून नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा सत्कार व अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here