राजवाडी येथे कृषी दिन साजरा…

लोलदर्शन 👉वालुर/ प्रतिनिधी.महादेव गिरी

 

राजवाडी,ता.सेलू येथे कृषी दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले..
हरित क्रांती चे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो..

राजवाडी येथे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन मार्गदर्शन, कापूस मुल्य साखळी बळकटीकरन विषयावर तालुका कृषी अधिकारी सेलू रामप्रसाद जोगदंड यांनी मार्गदर्शन केले. तसेच पंतप्रधान शुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या विषयावर मंडळ कृषी अधिकारी सेलू राजहंस खरात यांनी सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सेलू श्री जोगदंड साहेब, मंडळ कृषी अधिकारी सेलू श्री खरात साहेब, आत्मा ATM सोमेश्वर हुगे, कृषी सहायक श्री बोईनवाड, विलासराव कुंभार , बलभीम आवटे,संदीप शेळके,अनिल घुमरे,बबन जगदाळे,माणिक समिंद्रे व गावातील शेतकरी उपस्थित होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here