पाटोदा चा अवलिया

 

लोकदर्शनबीड पाटोदा ;👉राहुल खरात

हॉटेल विशाल पिट्ठी आणि नायगाव च्या मध्ये असणारे पोहे व नाष्टा यासाठी प्रसिद्ध साधेच हॉटेल आहे .परंतु सर्व सामान्य माणसाला परवडेल अशी वाजवी रेट यामुळे खूप छान हॉटेल चालत आहे या हॉटेलचे विशेष कोणत्याही ग्राहकाची एखादी वस्तू जर विसरली तर या हॉटेलचे मालक ती वस्तू काळजीपूर्वक ठेवून देतात आणि पुन्हा ती व्यक्ती ती वस्तू नेण्यासाठी आल्यानंतर इमानदारीने ती वस्तू त्या व्यक्तीला देऊन टाकतात आत्तापर्यंत बऱ्याच लोकांच्या वस्तू त्यांनी परत केलेल्या आहेत त्यांनी एक किस्सा सांगितला आठ दिवसापूर्वी एक महिला पर्स विसरून गेली होती ती परत चार दिवसांनी आल्यानंतर त्यांनी ती पर्स त्या पर्समध्ये 7500 रुपये होते त्यांनी तिला ती इमानदारी रक्कमेसह परत केली. सध्या सर्व जग पैशाच्या मागे लागलेले आहे अशा प्रसंगी या हॉटेलच्या मालकाची इमानदारी वाखाणण्यासारखी आहे माझी पाण्याची बाटली महागडी या हॉटेलमध्ये विसरली ती मी महिन्याने गेल्यानंतर त्यांनी मला ती परत केली म्हणून असं वाटतं जगात थोडा बहुत प्रमाणात का होईना इमानदारी आहे
या हॉटेल मालकाला खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचा हॉटेलचा व्यवसाय खूप भरभराटीस येऊ अशा प्रकारची शुभेच्छा देतो धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here