CIPET च्या नवनिर्मित भव्य सुंदर इमारतीला ला पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट .

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

चंद्रपूर. दी १६ जून CIPET(Central Institute of Plastic Engineering and Technology) च्या नवनिर्मित भव्य सुंदर इमारतीला ला पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट दिली. २०१६ मध्ये मोदी जी सरकारच्या काळात रसायन व उर्वरक मंत्रीपदी असतांना महाराष्ट्रात दुसरे केंद्र मंजूर करण्यात आले. भेटीदरम्यान CIPET च्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले त्याची पाहणी केली. विद्यार्थ्यांसोबत, कॅम्पस मुलाखतीसाठी आलेल्या युवकांसोबत चर्चा केली. २०१६-१७ पासून आतापर्यंत ४५०० च्या वर विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले व ३५०० च्या वर जवळपास ८० टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. या ठिकाणी Short Term courses, डिप्लोमा Courses सुरु आहेत भविष्यात Engineering चे ही अभ्यासक्रम सुरु होणार असल्याची माहिती चंद्रपूर CIPET चे संचालक श्री जोशी यांनी दिली. गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, नागपूर शिवाय महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी १० वी, १२ वी नंतर CIPET मध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन यावेळी केले. चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना अहीर यांनी यावेळी केल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *