भा ज पा कोरपना तालुक्याच्या वतीने संघटनात्मक बैठक संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती

भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करा श्री देवरावदादा भोंगळे भाजपा जिल्हा अध्यक्ष यांचे आव्हान

भारतीय जनता पार्टी कोरपना तालुका च्या वतीने संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री देवराव दादा भोंगळे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर प्रमुख पाहुणे मा श्री संजयभाऊ धोटे माजी आमदार राजुरा,मा श्री खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर,मा श्री सुदर्शनजी निमकर साहेब माजी आमदार राजूरा,श्री विवेकजी बोढे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष,श्री नामदेवराव डाहुले भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री सतीश उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री राजूभाऊ घरोटे किसान आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपुर,श्री नुतनकुमार जिरवणे पंचायत समिती सदस्य,किशोरजी बावणे सहकार आघाडी प्रमुख,श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष, सौ विजयालक्ष्मी डोहे महिला जिल्हा महामंत्री,सौ इंदिराताई कोल्हे जिल्हा सचिव व इतर मान्यवर उपस्थित होते श्री देवरावभाऊ भोंगळे जिल्हा अध्यक्ष यांनी कोरपना तालुक्यातील बुथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख,जिल्हा परिषद पंचायत समिती विविध विषयावची माहिती घेतली व माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आठ वर्षाच्या कार्यकाळात बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व पुढील 18 जून पर्यंत होनर्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावे असे आवाहन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री देवराव भाऊ भोंगळे व इतर मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक,विविध सोसायट्या, ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या पूर्ण सदस्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शक्ती केंद्र प्रमुखांना नेम प्लेट देऊन स्वागत करन्यात आले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य अरुण मडावी, शशिकांत अडकिने,विजय रणदिवे,अमोल आसेकर, प्रमोद कोडापे,जयाताई धारणकर, दिनेश सुर,संजयभाऊ चौधरी, नारायण कोल्हे, निखिल भोंगळे,उरकुडे,अनिल चांदेकर यांनी केले कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख,पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष यांनी केले तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *