‘दोन चाकं,435 दिवस’ हा माहितीपट आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

 

लोकदर्शन👉 राहुल खरात

रोडमॅप इंटरटेनमेंट ने तयार केलेला ‘दोन चाक 435 दिवस हा माहितीपट पुणे येथे झालेल्या अण्णाभाऊ साठे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाला असून सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा बहुमान या माहितीपटास मिळाला.या आंतरराष्ट्रीय लघुपट, माहितीपट फेस्टिवलचे ज्युरी म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि आटपाडी नाईटस् या सुप्रसिद्ध सिनेमाचे दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी काम पाहिले. जगभरातून वेगवेगळ्या देशातून आलेल्या एकशे पंचवीस लघुपट व माहितीपटातून ‘दोन चाकं, 435 दिवस’ या माहितीपटास सर्वोत्कृष्ठ माहितीपटाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात पुनवट या गावची राहणारी एकवीस वर्षाची तरुणी कु. प्रणाली चिकटे हिने संपूर्ण महाराष्ट्रात 435 दिवस सायकलवरून सतरा हजार किलोमीटरचा प्रवास केला आणि पर्यावरण वाचवा देश वाचवा या बाबत ठिकठिकाणी प्रबोधन केले. या घटनेची प्रसारमाध्यमांनीही विशेष दखल घेतली होती. प्रणालीच्या चिकटेच्या या पर्यावरण प्रवासावर आधारित हा माहितीपट तयार केला असून याची निर्मिती यजुर्वेंद्र महाजन व रोडमॅप इंटरटेनमेंट ने केली आहे अशी माहिती विशाल शिरतोडे यांनी दिली. विक्रम शिरतोडे प्रस्तुत असलेला हा माहितीपट गणेश राजकुमार धोत्रे यांनी दिग्दर्शित केला आहे. हा माहितीपट पूर्ण करण्यासाठी विशाल शिरतोडे, ऋषिकेश पवार, मनोज गवळी, निनाद काळे, ओंकार सांत्रस, देव ब्रह्मभट्ट, संकेत कुलकर्णी, मयूर राऊत, अक्षय मोरे, विशाल निकम, लखन चौधरी, अक्षय शिंदे, राजकुमार पाटोळे आदींनी सहभाग घेतला. प्रणाली चिकटे या पर्यावरण वाचवण्याचा संदेश देत सायकलवरून महाराष्ट्र फिरणाऱ्या एका जिगरबाज शेतकरी कन्येची कहाणी तळागाळात पोहचावी यासाठी टीमने विशेष मेहनत घेऊन बनवलेला माहितीपट आहे. फेस्टिवल मध्ये हा माहितीपट पाहिल्यानंतर अनेकांच्या यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या. प्रणाली चिकटेचा एक साहसी प्रवास यानिमित्ताने समाजासमोर आला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *