आटपाडी येथे राष्ट्रवादी युवक कार्यकारणीची आढावा बैठक पार पडली  !                                                               

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी : येथे दि ३/३/२०२२ रोजी राष्ट्रवादी युवक कार्यकारणीची आढावा बैठक पार पडली .या बैठकी साठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस मा अरुण असबे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मधे संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष मा.विराज दादा नाईक, मा.हणमंतराव देशमुख, मा.वैभव दादा पाटील , युवक तालुकाध्यक्ष सुरज पाटील यांनी कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांसमोर मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष ॲड. मा.बाबासाहेब मुळीक, राष्ट्रवादी सरचिटणीस मा.बाळासाहेब पाटील, सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मा.विराज दादा नाईक, माजी नगराध्यक्ष मा.वैभव दादा पाटील, तालुका अध्यक्ष मा.हणमंतराव देशमुख, युवकचे तालुका अध्यक्ष मा.सुरज (भैया) पाटील विलास नांगरे पाटील , विष्णूपंत पाटील युवा नेते रोहित देशमुख तसेच युवक तालुका कार्यकरणी सदस्य , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे नियोजन युवक तालुका सरचिटणीस नितीन डांगे , परशूराम सरक , किशोर गायकवाड अतुल पाटील यांनी केले.
या वेळी पक्षनिरीक्षक अरुण असाबे यांनी पक्ष सघटन मजबूत करायचे असेल तर गाव तिथं शाखा व बुत कमिटी करणे आवशयक आहे असे सांगितले.
युवक तालुकाध्यक्ष सुरज भैया पाटील यांनी येणाऱ्या काळात बुत कमिटी प्रत्येक गावात करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे व जयंत पाटील साहेब यांचे विचार तळागाळात पोहचवण्याचे काम युवक राष्ट्रवादी करेल असा विश्र्वास व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनीही युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे काम उत्तम पणे चालू आहे भविष्यात युवक राष्ट्रवादी काँग्रेस च्या पाठीशी उभा राहीन असे आपले मनोगत व्यक्त करताना केले.

युवा नेते वैभव पाटील यांनीही पुढील काळात आटपाडी तालुक्यात सुरज पाटील यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादी युवक भक्कम करण्यासाठी सर्वजण कामाला लागूया असे आवाहन केले.

युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका पदाधिकारी यांनी एकत्रित तालुका दौरा करून गाव तिथं शाखा करण्याचे नियोजन करावे असे आवाहन केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *