भारत सरकार खेल मंत्रालय द्वारा नेहरू युवा केंद्राच्या वतीने आटपाडी येथे बँक मित्रा कार्यक्रमाचे आयोजन.

लोकदर्शन आटपाडी ; 👉राहुल खरात सर

श्रीमती वत्सला देवी देसाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आटपाडी नेहरू युवा केंद्र सांगली व नेहरू युवा मंडळ काळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बँक मित्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमास नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक अरुणा कोचुरे मॅडम, त्याच बरोबर लेखाधिकारी संजय कुरणे साहेब, सागर होनमाने, नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष आदर्श समाजसेवक मा.मोहन भाऊ बागल, आटपाडी तालुका प्रतिनिधी सौ. मनीषा पोळ, वत्सला देवी देसाई गर्ल्स हायस्कूल चे मुख्याध्यापिका सौ. मोकाशी व्ही.व्ही., पर्यवेक्षक कुलकर्णी एम.एन. जाधव एन. आर. देशमुख एस. आर. पुजारी एस .जी. जावीर एन .बी‌. क्षिरसागर आर. एस. पुजारी एस.एम. गुरव एन. एम. इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. मोहन भाऊ बागल यांच्या हस्तेश्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मोकाशी व्ही.व्ही. मॅडम व पुजारी एस.जी. त्यांनी बँक मित्रा या बँकेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच बरोबर मुलांना नेहरू युवा केंद्राचे महत्व पाठवून दिले. यामध्ये मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली त्यामध्ये नेहरू युवा मंडळ काळेवाडी चे अध्यक्ष मा. मोहन भाऊ बागल यांनी खेल मंत्रालय व नेहरू युवा केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देत युवकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रशालेचे विद्यार्थी युवक युवती त्याच बरोबर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याच बरोबर पुजारी सरांनी कार्यक्रमाला उपस्थितांचे स्वागत केले व कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वांचे जावीर सर यांनी आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *