आयपीएल टी- २० मॅचमध्ये सट्टा लावणारे ९ सट्टेबाज गजाआड ; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त* *आयुश नोपानी ( भापोसे) यांच्या नेतृत्वात घुग्घूस येथे छापामार कारवाई

लोकदर्शन 👉राजेंद्र मर्दाने

*वरोरा* : जिल्ह्यातील पडोली व घुग्घूस पोलीस स्टेशन क्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना आयुश नोपानी (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा यांना गोपनीय सूचनेनुसार मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी वरिष्ठाच्या निर्देशानुसार घुग्घूस येथील एका घरावर छापामार कारवाई करून आयपीएल टी- २० चेन्नई व राजस्थान मॅच दरम्यान आँनलाईन पद्धतीने सट्टा लावणाऱ्या ९ इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २७ लाख ४४ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत शनिवारी घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सट्टेबाजांत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत असून सट्टेबाजांच्या पूर्ण नेटवर्कचा शोध सुरू आहे.
देशातील इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलचा १५ वा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. जेव्हापासून आयपीएल स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून सट्टेबाजीचा बाजार सुरू झाला. क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारे आणि सट्टा संचालक सुद्धा एक्टीव झाले. यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीसही सज्ज होते. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुश नोपानी (भापोसे) व अधिनस्त पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशन पडोली व घुग्घुस क्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना शुक्रवार, २० मे २२ च्या रात्रोच्या सुमारास बातमीदाराकडून खबर मिळाली की, घुग्घुस येथील केमिकल वार्ड क्रं.६ येथील रहिवासी पृथ्वीराज घोरपडे यांच्या घरातील एका खोलीमध्ये ५ – ६ इसम आयपीएल क्रिकेट मॅचवर लोकांकडून मोबाईल फोनवरून पैशाची पैज लावून हार – जीतचा जुगार खेळत आहे. या सूचनेच्या आधारावर नोपानी यांनी तात्काळ ही माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांना दिली. त्यांनी आपले अधिनस्त पोलीसकर्मचारी पाठवून छापामार कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आयुश नोपानी यांच्या नेतृत्वाखाली अधिनस्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घरातील दर्शनी भागातील एक दार बंद असलेल्या खोलीतून काही लोकांची कुजबुज कानी येताच सट्टेबाजांना रंगेहाथ पकडण्याची योजना आखली. त्यानुसार खोलीचे दार वाजवून आतील लोकांना आवाज दिला. खोलीच्या आतील लोकांनी दार उघडले असता त्यांना पोलीस परिचय देऊन त्यांच्या नाव पत्त्याची विचारणी केली. सदर खोलीची पाहणी केली असता खोलीतील अंथरलेल्या गादी सभोवती ६ इसम बसलेले आढळले. यांच्या समोरच होल्ड पेटी मध्ये एकूण २४ नग मोबाईल फोनची जोडणी करून ईतर १२ अॅन्ड्रॉइड फोन गादीवर ठेवून आयपीएल क्रिकेट मॅचवर लोकांकडून मोबाईल फोन वरून पैशाची पैज लावून हार जीतचा जुगार खेळ खेळविला जात असल्याचे दिसून आले. यात जमीर खां उर्फ जम्मू मेहबूब ( वय- ३८ वर्षे), मोहम्मद सैफ सब्बीर चीनी ( वय-२५ वर्षे), मोहम्मद हाशिम मोहम्मद अनिस ( वय- १९ वर्षे), एजाझ अली ताहर अली (वय – ४६ ), सर्व राहणार मोमिनपूरा, वणी., निलेश काश्मीरलाल अरोरा (वय – ४६ वर्षे ) रा. साईनगर बामणीरोड, वणी, मनीष डफ ( वय- ४४ वर्षे ) रा. रविनगर ,वणी, रामू सेठ, रा. दत्त चौक, यवतमाळ, इम्रान मनेजर रा.वणी, रोहीत घोरपडे या. वार्ड क्रं.६, घुग्घुस यांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत तेथे उपस्थित जमीर खां ने सांगितले की, आज शुक्रवारी आयपीएल क्रिकेट मध्ये राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग अशी क्रिकेट मॅच सुरू आहे व याच मॅचवर लोकांकडून मोबाईल फोन द्वारे संपर्क करुन पैशाची पैज लावली जात आहे. जमीरच्या जबानीनंतर खोलीतून आयपीएल सट्टाबाजार संबधित आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली. यात ३६ मोबाईल, २ लॅपटॉप, १ एलसीडी टीव्ही, पर्सनल एसी, विद्युत् प्रवाह नियंत्रित करणारे यंत्र, केबल/ तार, रिमोट कंट्रोल, एम.एच.२९ बीसी ५७८६, फॉरच्युनर गाडी, एम.एच. ४८ पी ४१६३ डस्टर गाडी, घरगुती सामान, आंकडे लिहलेले कागद, पेन, अंग झडतीतून १९५० रुपये इत्यादी एकूण २७ लाख ४४ हजार ५९० चार मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच वरील प्रमाणे नमूद आरोपींकडे वापरात असलेले सिम कार्ड हे अन्य व्यक्तीच्या नावे नोंदणीकृत असून सिम कार्डाचा गैरवापर आरोपींकडून होत असल्याचे दिसून आले. शुक्रवार रात्री व शनिवारी पहाटे पर्यंत सदर कारवाई सुरू होती.
आरोपींवर भारतीय दंड संहिता ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४,५ व भारतीय तार अधिनियम कलम २५ (ब ) नुसार शनिवारी घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी आयुश नोपानी यांच्या नेतृत्वाखाली अधिनस्त पोलीस कर्मचारी मनोहर आमने, सुशांत निमगडे, दीपक मेश्राम,विठ्ठल काकडे इत्यादीचा या कारवाईत सहभाग होता. उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर होत असलेल्या कारवाईने वाळू तस्करां सोबतच आता सट्टेबाजार करणाऱ्या सट्टेबाजांत एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या टीमचं विशेष कौतुक होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *