महाविद्यालयांच्या उन्हाळी सुट्ट्या वाढविण्याची गोंडवाना यंग टीचर्स ची कुलगुरू कडे मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचिरोली-गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या अकॅडमिक कॅलेंडर नुसार 2021-22 चे पूर्ण सत्र 30/ 8/ 2021 ते 15/ 7 /2022 पर्यंत असून सेकंड टर्म(Even Semester) मध्ये उन्हाळी सुट्ट्या या 16 जून2022 ते 15 जुलै 2022 या कालावधीकरिता दिलेले आहेत.
महाविद्यालयीन शिक्षकांना प्रशासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नैमित्तिक रजा, इतर रजा नसतात. तसेच हिवाळी व उन्हाळी सुट्टी कालावधीत परिक्षेसंबधी कामकाज करित असतात. मागील दोन वर्षापासून करोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हिवाळी व उन्हाळी सुट्ट्या ह्या कमी करण्यात आलेल्या होत्या. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठाने हिवाळी व उन्हाळी सुट्ट्या कमी केलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर संघटनेने उन्हाळी सुट्ट्या वाढवण्याची मागणी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे कडे केलेली आहे
विशेष म्हणजे चालू सत्रामध्ये परिस्थिती ही मोठ्या प्रमाणात सुधारलेली असून महाविद्यालयीन कामकाज देखील ऑफ लाइन पद्धतीने सुरळीत सुरू आहेत.
विशेष म्हणजे गोंडवाना विद्यापीठाचे पालक विध्यापिठ असणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर व बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी सत्र 2021-22 मध्ये उन्हाळी सुट्ट्या 45 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता दिलेल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र 2021- 22 मध्ये 180 दिवसापेक्षाअधिक शिकवणी कालावधी पूर्ण होत असल्यामुळे विद्यापीठाच्या अकॅडमिक कॅलेंडर कुठलाही परिणाम न होता देखील इतर विद्यापिठाप्रमाणे गोंडवाना विद्यापीठ देखील सेकंड टर्म मध्ये उन्हाळी सुट्ट्या किमान 45 दिवसाच्या देऊ शकत असून त्या अनुषंगाने उन्हाळी सुट्ट्या 01 जून 2022 ते 15 जुलै 2022 या कालावधी करीता दिल्यास त्याच्या अकॅडेमिक कॅलेंडर वर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच 01 जून 2022 पासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही.तसेच परिक्षेच्या कामावरही त्याच्या कोणत्याही परिणाम होणार नाही.
करिता गोंडवाना विद्यापीठाने शैक्षणिक सत्र 2021- 22 च्या उन्हाळी सुट्ट्या ह्या किमान 45 दिवसाच्या करून 01 जून 2022 ते 15 जुलै 2022 या कालावधी करीता देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाव्दारे गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने मा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या कडे केली आहे. मा. कुलगुरू महोदयांनी विषयाचे महत्व ओळखुन अँकेडेमीक काँसिलमध्ये याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असा आशावाद व्यक्त केला आहे. सदर विषयाबाबत मा. कुलगुरू महोदयासोबत चर्चा करण्याकरिता यंग.टीचर्स असोसिएशन चे सचिव डॉ. विवेक गोर्लावार, उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते, सहसचिव डॉ. प्रमोद बोधाणे,महिला आघाडी प्रमुख डॉ. लता सावरकर, विभाग समन्वयक डॉ. राजेंद्र गोरे, डॉ. कैलास भांडारकर, प्रा. रूपेश कोल्हे, डॉ. पंकज ढुमणे, प्रा.अजय निबांळकर, प्रा. दिपक तायडे, प्रा. हितेश चरडे आदी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *