पदाच्या वापर जनसेवेकरीता करा : खासदार बाळू धानोरकर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕चिमुर प्रकल्प स्तरीय समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मागरे*

चंद्रपूर : कोणतेही पद हे कायम स्वरूपी नसते. त्यामुळे पदाचा उपभोग न घेता त्या पदाचा वापर जनसेवेकरीता करा असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते चिमुर प्रकल्प स्तरीय समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मागरे, रमेश मेश्राम सदस्य, अनिल चौधरी सदस्य, अरुण बरडे सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याप्रसंगी बोलत होते.

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील कार्यक्रमाच्या आढावा घेण्यासाठी नेमलेल्या प्रकल्पस्तरीय समित्यांवर १८ मे रोजी आदिवासी विकास विभागाने अशासकीय सदस्यांची नियुक्ती केल्या आहे. याकरिता वरोरा भद्रावती मतदार संघातील आदिवासी बांधवांना न्याय मिळण्याकरिता त्यांचे प्रश्न निकाली काढण्याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी चार पदाधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली. आदिवासी मंत्री महोदयांनी चार ही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर बोलताना म्हणाल्या कि, मतदारसंघाच्या विकास करण्यासाठी समाजातील समस्या जाणाऱ्या लोकांकडे नेतृत्व असले पाहिजे. तरच त्या समस्या मार्गी लागू शकतात. मतदार संघात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत. त्यांच्या समस्या देखील प्रशासनाच्या दरबारी गेल्या नसल्याने अनेक दशकापासून मार्गी लागल्या नाही. त्यामुळे या पदाच्या वापर त्यांच्या समस्या मार्गी लावण्याकरिता व्हावा असे प्रतिपादन त्यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *