प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण न होताच प्रशासनाने केपीसीएल ला उत्खननाची मान्यता दिली हे दुःखद व निषेधार्ह – हंसराज अहीर

लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर 

 

 

चंद्रपूर:– बरांज येथील कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. व्दारा कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्या व समस्यांचे निराकरण केले नसतांनाही प्रशासनाने कर्नाटक पाॅवर कार्पोरेशनला कोळसा उत्खननास मान्यता दिली हे कृत्य दुखःद व तेवढेच निषेधार्ह असल्याचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
बरांज कोळसा खाण कर्नाटका पाॅवर कार्पोरेशन लिमी ला लीज व्दारा हस्तांतरीत केली असुन सन 2015 पासुन या कोळसा खाणीतील उत्खनन बंद होते. सदर खाण सुरू होण्याच्या मार्गावर असतांना व या प्रकल्पातील प्रकलपग्रस्त, बाधीत गावे व जुने कामगार, कर्मचारी आदी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा सुरू असतांना या समस्यांचे निराकरण होण्याअगोदरच जिल्हाधिकाÚयांनी केपीसीएलला कोळसा उत्खननाची मान्यता देवून कर्नाटक राज्य सरकारची बाजु सांभाळली व स्थानीक शेतमालक असलेल्या प्रकल्पग्रस्तांना वाÚयावर सोडुन दिले. हा निर्णय अत्यंत वेदनादायी व तितकाच निषेधार्ह असल्याचे अहीर यांनी म्हटले आहे. सदर प्रकार हा मुळ मालक व स्थानीकांचा अपमान असुन ग्रामपंचायत आमसभेच्या ठरावाला कचÚयात टाकुन प्रशासनाने अवहेलना केली असल्याचेही अहीर यांनी स्पष्ट केले.
वास्तविक पाहता राज्य सरकारला काहीच भुर्दंड सोसावा लागत नाही. निधीसुध्दा द्यावा लागत नसतांना असला उफराटा निर्णय घेतला जाणे प्रकल्पग्रस्तांचे नुकसान करणारे आहे. राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारात वाढ होणे अपेक्षित असतांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे असतांना या बाबीस तिलांजली देत जिल्हाधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय घेवून प्रकल्पग्रस्तांच्या भावना दुखावल्या आहेत. ते असे का वागले? हे समजण्यापलीकडचे आहे असेही अहीर यांनी म्हटले आहे.
प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्याच बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या संबंधात निर्णय झालेला असतांना त्या निर्णयाची अंमलबजावणी करवून न घेता त्यांनी मान्यता दिलीच कशी याबाबत अहीर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रशासनाने दिलेली उत्खननाची परवानगी त्वरीत रद्द करून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास प्रधान्य द्यावे अशी विनंती करतांनाच या अन्यायाच्या विरोधात नजीकच्या काळात प्रकल्पग्रस्तांसह तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय राऊत जिल्हा महामंत्री राजेश मुन, नामदेव डाहुले, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भद्रावती पं.स. सभापती प्रविन ठेंगने, नरेंद्र जिवतांडे, भाजपा किसान आघाडी अध्यक्ष राजु घरोटे, प्रशांत घरोटे, बरांज (मोकासा) चे सरपंच सौ मनिषा ठेंगने, उपसरपंच रमेश भुक्या व प्रकप्लग्रस्त संजय ढाकने, सुधीर बोढाले, मनोहर बोढाले, विजय रणदीवे, श्रीराम महाकुलकर, लक्ष्मण भुक्या आदिंची उपस्थिती होती.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *