कोरोनाच्‍या संकटात लोकप्रतिनीधींनी जनतेला सर्वतोपरी सहकार्य करावे. – आ. सुधीर मुनगंटीवार*दि

दि 21_4/2021 👉by shivaji selokar
*प्राथमिक आरोग्‍य केंद्रांना आवश्‍यक यंत्रसामुग्रीसाठी आमदार निधीतुन  दोन कोटी रू निधी खर्च करणार*

*लसीकरण, जनजागरण व टेस्‍टींग याकडे विशेष लक्ष देण्‍याचे आवाहन*

कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्‍या या संकटाचा सामना करतांना भाजपाचे कार्यकर्ते व लोकप्रतिनीधी या नात्‍याने आपले सक्रीय योगदान देत मास्‍क, सॅनिटायझरचे वितरण नागरिकांमध्‍ये करत जनजागरण करण्‍याची आवश्‍यकता आहे. विशेषत: आपल्‍या भागात जास्‍तीत जास्‍त लसीकरण व्‍हावे यादृष्‍टीने सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्‍न करण्‍याची आवश्‍यकता आहे. कोरोनाच्‍या संकटाचा सामना करतांना बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात 30 हजार मास्‍क चे वि‍तरण करण्‍याचे नियोजन आपण केले आहे. त्‍याचप्रमाणे प्राथमिक आरोग्‍य केंद्रांना आवश्‍यक यंत्रसामुग्रीचा पुरवठा करण्‍यासाठी 2 कोटी रू. निधी आमदार निधीच्‍या माध्‍यमातुन खर्च करणार असल्‍याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक २१ एप्रिल रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऑनलाईन बैठकींच्‍या माध्‍यमातुन बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील जिल्‍हा परिषद सदस्‍य, मुल व पोंभुर्णा येथील नगरसेवकांशी संवाद साधला. व्‍हेंटीलेटर तसेच ऑक्‍सीजन बेडस् मागण्‍याची वेळच येवू नये म्‍हणुन सुरवातीपासुनच काळजी घेण्‍याच्‍या दृष्‍टीने जनजागरण अतिशय महत्‍वाचे असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले. आरोग्‍य व्‍यवस्‍था पुर्णपणे कोलमडलेली आहे. जिल्‍हा परिषद सदस्‍यांनी प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या स्‍तरावर रूग्‍णांना आवश्‍यक ती मदत करावी, रूग्‍णवाहीका उपलब्‍ध नसल्‍यास भाडयाची वाहने त्‍यांना उपलब्‍ध करून दयावी असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सुचित केले. मुल शहरात चाचण्‍यांची संख्‍या वाढवावी असे सांगत उपलब्‍ध असलेल्‍या दोन लसीकरण केंद्राची संख्‍या चार करण्‍याबाबत आपण प्रशासनाशी चर्चा करू असेही ते म्‍हणाले. पोंभुर्णा शहरात पाच हजार मास्‍क वितरण करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगीतले.

मदतकार्य असो वा सेवाकार्य भारतीय जनता पार्टी नेहमीच अग्रेसर राहीली आहे. आपल्‍या पक्षाची ही ओळक कायम ठेवत या संकटकाळात नागरिकांना जास्‍तीत जास्‍त मदत करण्‍याचे आवाहन करत लोकप्रतिनिधींनी जनजागरण, लसीकरण व चाचण्‍या याकडे विशेष लक्ष देण्‍याच्‍या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिले. जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जि. प. सदस्‍य हरीश गेडाम, राहुल संतोषवार, रोशनी खान, वनिता आसुटकर, वैशाली बुध्‍दलवार, प़थ्‍वीराज अवताडे यांच्‍यासह मुलच्‍या नगराध्‍यक्षा रत्‍नमाला भोयर, उपाध्‍यक्ष नंदु रणदिवे, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार, अजय साखरकर, अल्‍का आत्राम, गजानन गोरंटीवार, ईश्‍वर नैताम, रजिया कुरेशी आदी लोकप्रतिनीधीची उपस्थिती होती.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *