महा ज्योती संशोधन अधिछात्रवृत्ती चा लाभ घेण्यासाठी संशोधकांना पीएचडी नोंदणी प्रमाणपत्र त्वरित द्यावे*- *गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ची मागणी       

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा-महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील नाँन- क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय,विमुक्त जाती ,भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना संशोधन करण्यासाठी 5 वर्षासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते
पूर्णवेळ व नियमित पीएच.डी करणाऱ्या महाराष्ट्रातील नाँन- क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिशिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रतिमहा 31 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम तारीख 31 मे 2022 दिलेलीआहे
या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत पीएचडी करणाऱ्या विविध विद्याशाखेतील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांची विषयाच्या संशोधन व मान्यता समितीची सभा(RRC) दिनांक 29 एप्रिल 2022 पासून सुरू असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपरोक्त सर्व विद्यार्थ्यांना 31 मे 2022 आधी नोंद नोंदणी प्रमाणपत्र देण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ असोसिएशनने कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचेकडे केली असून यासंबंधीचे निवेदन दिले आहे. याबाबत मा. कुलगुरू महोदयांनी चर्चेच्या माध्यमातून Ph.D. पात्र उमेदवारांना 31मे 2022 च्या आधी नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबत विद्यापीठ प्रयत्न करेल असा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेचे सचिव डॉ.विवेक गोरलावार, उपाध्यक्ष डॉ.नंदाजी सातपुते, सहसचिव डॉ.प्रमोद बोधाने, महिला आघाडी प्रमुख डॉ. लता सावरकर विभाग समन्वयक डॉ.राजेंद्र गोरे प्रा.रुपेश कोल्हे, डॉ. कैलास भांडारकर प्रा.अजय निंबाळकर प्रा.दीपक तायडे प्रा.पंकज ढुमणे,प्रा. हितेश चरडे इत्यादी संघटनेच्या पदाधिकाऱी आणि सदस्य चर्चेला उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *