काँग्रेसच्या माधुरी जांभळे यांची वासंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 11एप्रिल
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वासंबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक आज दुपारी 2 वाजता पार पाडली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने माधुरी भगवान जांभळे यांनी आपला उपसरपंच पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपसरपंच म्हणून घोषित केले.यावेळी मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी वासंबे येथे जाऊन नवनिर्वाचित उपसरपंच माधुरी भगवान जांभळे यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी खालापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. कृष्णाशेठ पारंगे, सभापती कांचन पारंगे,रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल डवले,प्रतिप पाटील, श्वेता कांबळे ,देविदास म्हात्रे, विनायक डवले, भगवान जांभळे, शाम म्हसकर, सागर सुखदरे, संजय कांबळे, संतोष चौधरी व मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *