Home
Home वरोरा प्रा. सुनंदा पिदुरकर मानवाधिकार सहायता संस्थानच्या महामंत्री पदी नियुक्त

प्रा. सुनंदा पिदुरकर मानवाधिकार सहायता संस्थानच्या महामंत्री पदी नियुक्त

लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने
*वरोरा* : मुक्ताई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, वरोऱ्याच्या सचिव सुनंदा विलास पिदूरकर तसेच मानवाधिकार सहायता संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा प्रभारी यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी करण्यात आलेली आहे. उच्चशिक्षित सुनंदा पिदुरकर या राजर्षी शाहू कान्व्हेंट येथे प्राचार्य असुन त्यांचा वरोरा परीसरातील सामाजिक संस्था तसेच विविध कार्यक्षेत्र यांच्याशी निकटचा संबंध आहे. त्यांनी अल्पावधीतच मानवाधिकार संघाकरीता केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांची कार्याविषयीची आस्था, प्रेम, कर्तव्यनिष्ठता बघुन यांना महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदाचा अधिभार देण्यात येत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मानवाधिकार सहायता संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सोनु सिंह यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती केली. या नियुक्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here