Home
Home Breaking News शुभम गवई यांची भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

शुभम गवई यांची भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने

*वरोरा* : येथील युवा, तडफदार सामाजिक कार्यकर्ते शुभम गवई यांनी संघटना वाढीसाठी अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची भीम आर्मी, भारत एकता मिशनच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार प्रदेश महासचिव शंकर मून आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बन्सोड यांनी केली आहे.
शुभम गवई यांचा वरोरा तालुक्यातील सामाजिक संस्था व विविध समाज जणजागृती कार्याशी निकटचा संबंध आहे. भीम आर्मीचे वरोरा अध्यक्ष म्हणूनही त्यांचे कार्य प्रशंसनीय असून संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जनहिताच्या विविध मुद्द्यांवर आवाज बुलंद केला, अनेकांना न्याय मिळवून दिला. जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली जबाबदारी कर्तव्यनिष्ठपणे पार पाडली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन, त्यांना बढती देऊन संघटनेने चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षाची जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. या पदाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे शुभम गवई यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here