आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मोहन बागल यांचा धडाकेबाज सत्कार !

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहूल खरात

ग्रामपंचायत हिवतड व वि.का.स. सोसायटी हिवतड
कार्यसम्राट हिवतड गावचे सरपंच श्री.उमाजी सरगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नागरी सत्कार आदर्श समाजसेवक आटपाडी खानापूर तालुक्यातील गोरगरीब, विधवा,परित्यक्ता, वयोवृद्ध, निराधार,दिव्यांग नागरिकांना ज्यांना कुणाचाही आधार नाही कोणत्याही प्रकारची मदत नाही ज्यांच्याकडे समाजही लक्ष देत नाही आशा गोरगरिब जनतेचे कल्याण व्हावे म्हणून सतत धडपड करणारे काळेवाडी गावचे सुपुत्र मा‌.मोहन भाऊ बागल. यांचा सत्कार माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित समाज कल्याण सभापती प्रमोद आप्पा शेंडगे, आटपाडी पंचायत समिती सभापती जयवंत सरगर, पंढरपूरचे माऊली हळवणकर, तडवळे माजी सरपंच दादासाहेब हुबाले, हिवतड गाव चे कार्य सम्राट सरपंच उमाजी सरगर, पोलीस पाटील अरुण कुमार सुतार, युवक नेते दत्ता काळे, सामाजिक कार्यकर्ते नकुल जावीर, अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आदर्श समाजसेवक मोहन भाऊ बागल यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जयंत भाऊ सरगर यांनी केले, आभार हिवतड वि.का.स.सोसायटीचे चेअरमन धर्मराज देशमुख यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *