राज्य स्तरीय डान्स स्पर्धेचा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन

*⭕शिवसेना प्रणित द्रोणागिरी व्यापारी असोसिएशन व प्रतीक पाटील फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.*

लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे दि 2मे महाराष्ट्र राज्य दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक 01 मे 2022 रोजी शिवसेना प्रणित द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनच्या पहिल्या वर्धापनदिना निमित्त अध्यक्ष रवींद्र पाटील व प्रतीक पाटील फॉउंडेशनचे संस्थापक तथा शिवसेना द्रोणागिरी उपशहर प्रमुख प्रतीक पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उरण तालुक्यातील द्रोणागिरी शहर येथील राज्य डान्स स्पर्धेचा उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण चे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या हस्ते झाला.

या वेळी उरण शहरसंपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, द्रोणागिरी शहरसंपर्कप्रमुख कल्पेश पाटील, द्रोणागिरी शहरसंघटक किसन म्हात्रे, युवासेना शहरप्रमुख करण पाटील, शहर सचिव धनंजय शिंदे, फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ भोईर, उद्योगपती नरसु पाटीलसर, कुणाल पाटील, शिक्षक नेते रमणिक म्हात्रे, बोकरविडा अध्यक्ष त्रिशूल ठाकूर, कार्याध्यक्ष विदित पाटील, नवीन शेवा उपसरपंच वनिता म्हात्रे, सदस्या रंजना घरत, सुरेखा भोईर, उपजिल्हायुवती अधिकारी कु. रविना ठाकूर, उपतालुका युवती अधिकारी कु. बेबी ठाकूर, उपतालुका युवती अधिकारी कु. अंकिता घरत व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना प्रणित द्रोणागिरी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष कुणाल घरत, सेक्रेटरी श्रावनकुमार व प्रतीक पाटील फॉउंडेशन संस्थापक व शिवसेना द्रोणागिरी उपशहर प्रमुख प्रतीक पाटील, हितेश घरत, ओमकार कडू व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दर्शना माळी यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *