काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीस प्रारंभ

लोकदर्शन 👉 By Shankar Tadas

⭕*पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत “घर चलो, घर-घर चलो” अभियानाला सुरुवात*

नागपूर, १२ मार्च :- अ. भा. काँग्रेस कमिटीतर्फे डिजिटल सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. याच पाश्वभूमीवर आज राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आशी नगर, टेका येथे “घर चलो, घर-घर चलो” अभियानाला उपस्थित राहुन काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीस सुरुवात केली. ३१ मार्चपर्यंत पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसापर्यंत पोहोचवून त्यांची डिजिटल नोंदणी करावी असे आव्हान यावेळी राऊत यांनी केले.

प्रसंगी रत्नाकर जयपुरकर, दिपक खोब्रागडे, सुरेश पाटील, डॉ. नियाजुद्दीन सिद्दिकी, निलेश खोब्रागडे, इरशाद शेख, सतिश पाली प्रामुख्याने उपस्थित होते.

ब्लॉक क्रंमाक १४ अंतर्गत आशीनगर, टेका येथे घर चलो, घर-घर चलो अभियाना अंतर्गत नागरिकांच्या घरी जावून सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले.
यावेळी सचिन डोहाने, इमरान खान, अलिम बफाती, अलिक मालिक, रविंद्र सिंग राणा, कल्पना द्रोणकर, रेशमा नंदागवळी, सोनु वाघमारे, अस्मिता पाटील, रजंना मेश्राम, शाहिदबेगम खान, सोनाली सोनटक्के, कुंदा खोब्रागडे, शितल गेडाम, प्रकाश नांदगावे, अमित मडावी, अक्षय बोरकर, ज्वांटी लक्की, अलोणी मायकल, मो.अनिस, कबीर अंसारी, कासम कूरेशी, सुजित गणवीर, विलीयम साखरे, प्रणाली गांवडे, ज्योती खोब्रागडे, सुशांत गणवीर, उमेश ढकोरे, सचिन वासनिक, कुणाल निमगडे, दिनेश सावरकर, शिमा चंद्रिकापुरे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *