1 वाटी साबुदाणा 5 समस्यांवर आहार औषध, बायकांच्या तब्येतीसाठी तर साबुदाणा वरदान.

 

लोकदर्शन संकलन -👉 साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
13 मार्च 2022.

स्त्रियांच्या अनेक आरोग्यसमस्यांसाठी एक वाटी साबुदाण्याची खिचडी खाणं म्हणजे उपचार. आरोग्यविषयक समस्यांमध्ये स्त्रियांसाठी फायदेशीर असलेला साबुदाणा कोणत्या समस्यात कधी आणि किती खावा?

साबुदाणा प्रमणात खाल्ला तर औषधी उपाय आणि मर्यादेपलिकडे खाल्ला तर अपाय ठरतो
स्पाॅटिंगचा त्रास होस असल्यास वाटीभर साबुदाणा खिचडी खाणं औषधासारखा उपाय ठरतो.
प्रजननक्षमता वाढण्यासाठी साबुदाणा खिचडी खाणं परिणामकारक उपाय आहे.
नाश्त्याला चविष्ट काही खाण्याची इच्छा झाली की साबुदाण्याची खिचडी केली जाते. उपवास म्हटला की फराळासाठी साबुदाण्याच्या खिचडीचा पर्याय इतर सर्व पर्यायांआधी सूचतो आणि सोपाही वाटतो. केवळ उपवासालाच नाहीतर एरवी सकाळच्या नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी आवडीनं खाल्ली जाते. उपवासाला साबुदाणा खिचडी करताना त्यात मिरची, जिरे, कोथिंबीर, शेंगदाणे, लिंबू, साखर आणि तेल/ तूप यांचाच वापर करता येतो. मात्र उपवास वगळून एरवी जेव्हा नाश्त्याला साबुदाणा खिचडी केली जाते तेव्हा त्यात कढीपत्ता, कांदा, गरम मसाला, हळद या गोष्टींचा वापर करुन तिला आणखी चविष्ट केली जाते.

साबुदाणा प्रमणात खाल्ला तर औषधी उपाय आणि मर्यादेपलिकडे खाल्ला तर अपाय ठरतो असं आहारतज्ज्ञ सांगतात. महिलांच्या आरोग्यासाठी साबुदाणा खिचडी तर अमृत आहे असं प्रत्यक्ष स्टार आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात. साबुदाण्यात कॅलरीजचं प्रमाण जास्त असल्याने साबुदाणा खाल्ल्यावर ऊर्जा मिळते, उत्साह वाटतो. ग्लुटेन फ्री असलेला साबुदाणा पचन सुधारण्यास मदत करतो. रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरणारा साबुदाणा हाडं आणि स्नायू बळकट करण्यासाठी महत्त्वाचा आहे. साबुदाण्यात टॅनिन, फ्लेवोनाॅइडस ॲण्टिऑक्सिडण्ट हा त्वचा, केस आणि आरोग्यास फायदेशीर असणारा घटक साबुदाण्यात असल्यानं साबुदाणा केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिध्द आहे.

आरोग्यास फायदेशीर असणारा साबुदाणा महिलांच्या आरोग्यासाठी तर वरदान आहे असं आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणतात. स्त्रियांच्या अनेक आरोग्यसमस्यांसाठी एक वाटी साबुदाण्याची खिचडी खाणं म्हणजे उपचार असं ऋजुता दिवेकर म्हणतात. आरोग्यविषयक समस्यांमध्ये स्त्रियांसाठी फायदेशीर असलेला साबुदाणा कोणत्या समस्यात कधी आणि किती खावा याबाबतचं सविस्तर मार्गदर्शनही ऋजुता दिवेकर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरील साबुदाणा खिचडीच्या पोस्टमध्ये केलं आहे.

वाटीभर साबुदाणा खिचडी कधी खावी?

1. साबुदाणा खिचडीमुळे जिभेवरील चव ग्रंथी उत्तेजित होवून तोंडाला चव येते. त्यामुळे फ्ल्यू, ताप यासारख्या आजारातून लवकर बरं होण्यासाठी आठवड्यातून एकदा साबुदाणा खिचडी खावी. फ्ल्यू/ तापावरचे ॲण्टिबायोटिक्स औषधं संपल्यानंतर तोंडाची चव वाढण्यासाठी आणि आजारपणातून पटकन बरं होण्यासाठी आठवड्यातून एक वेळा वाटीभर साबुदाणा खिचडी खावी.

2. पाळी येण्याआधी एक आठवडा पाळीची लक्षणं दिसतात. ही लक्षणं काहींच्या बाबतीत त्रासदायक असतात. या लक्षणांमुळे पचन बिघडतं, भूक कमी होते. अशा वेळी दुपारच्या जेवणात एक छोटी वाटी साबुदाणा खिचडी खावी.

3. पाळी जवळ आल्यानंतर अनेकींना स्पाॅटिंगचा त्रास होतो. अशा त्रासाप्रसंगी एक छोटी वाटी साबुदाणा खिचडी आवर्जून खाल्ल्यास फायदा होतो असं ऋजुता दिवेकर सांगतात. स्पाॅटिंगचा त्रास टाळण्यासाठी पाळी जवळ आली की आठवड्यातून एक-दोनदा दुपारच्या जेवणात साबुदाणा खिचडी खाण्याचा फायदा होतो.

4.आठवड्यातून एक/ दोनदा एक छोटी वाटी साबुदाणा खिचडी खाल्ल्यास प्रजनन क्षमता सुधारते. ऋजुता दिवेकर म्हणतात बीजांडं फ्रिज करण्याचे प्रयत्न करायचे असल्यास इंजेक्शन कोर्स सुरु झाल्यानंतर आठवड्यातून दोनदा एक वाटी साबुदाणा खिचडी खाण्याचा सल्ला ऋजुता दिवेकर देतात.

5. मेनोपाॅज किंवा एंडोमेट्रीयोसिसच्या त्रासात रक्तस्त्राव जास्त होत असल्यास आठवड्यातून एक वेळा किंवा मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी एक छोटी वाटी साबुदाणा खिचडी खाल्ल्यास फायदा होतो असं ऋजुता दिवेकर सांगतात.

संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
13 मार्च 2022.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *