बंकट्स्वामी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

लोकदर्शन 👉 राहुल खरात

खडकीघाट -येथील श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकीघाट संस्थेच्या बंकट्स्वामी विद्यालयात वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांना सस्नेह निरोप देण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखक मा. डॉ. मधुकरराव क्षीरसागर ग्रामीण कथाकार पीव्हीपी कॉलेज पाटोदा यांना पाचारण केले होते परंतु प्रकृती स्वास्थ्यामुळे ऐनवेळी ते येऊ शकले नाहीत. म्हणून खाकरे क्लास चौसाळा येथील अविनाश खाकरे सर यांना बोलावण्यात आले.
वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यांनी हा निरोप समारंभ आयोजित केला होता सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर आणि प्रमुख पाहुणे अविनाश खाकरे सर यांच्या हस्ते महिला दिन असल्यामुळे राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि आमची संस्था ज्यांच्या नावाने आहे असे वैकुंठवाशी ह. भ. प. बंकटस्वामी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा व अध्यक्ष यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला तसेच शाळेतील शिक्षकवृंद यांचाही सत्कार करण्यात आला वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी” स्कूल डे “आयोजित केला होता.त्या शिक्षकांचा वर्ग नववीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं सत्कार केला. तसेच याप्रसंगी वर्ग नववीच्या वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली .वर्ग दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना भाषण करत असताना गहिवरून आले होते बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी शाळेविषयी असणारे प्रेम आदर आपल्या भाषणांमधून व्यक्त केला तसेच इतर वर्गातील मित्र मैत्रिणी विषयी भावना व्यक्त केल्या काही शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना बद्दल आपले मत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अविनाश खाकरे यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी मार्गदर्शन करून येणार्‍या एसएससी बोर्डाच्या परीक्षेला शुभेच्छा दिल्या .
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांनी आपल्या काव्यमय शैलीत विद्यार्थ्यां बद्दलच्या भावना व्यक्त करून विद्यार्थ्यांना खूप मोठे होऊन या शाळेत कार्यक्रमासाठी येण्याचे सांगितले शाळेला विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व आपल्या आई-वडिलांना कधीच विसरू नका असेही सांगितले कोणत्याही क्षेत्रात गेलात तर त्याठिकाणी यश मिळवून चमक दाखवा असे सांगितले यावेळी दहावीचे विद्यार्थी खूप भावुक झाले होते . येणाऱ्या परीक्षेस कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या व शाळेला विसरू नका असे सांगितले
वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी व शाळेने सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.स्वरुपा भोसले वर्ग 9 वी आणि आदित्य तावरे वर्ग 9 वी यांनी अतिशय उत्कृष्ट काव्यमय शैलीत केले.आणि जेवणानंतर कार्यक्रम संपला.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक श्री संभाजी उंदरे सर, श्री संकेत सुपेकर सर, श्री रामहरी रिंगणे सर महेश मोरे सर श्री तानाजी खाकरे सर श्री अशोक आनेराव सर, श्री संजय बनसोडे सर, श्री पोपट कुरे सर श्री अशोक मांजरे सर श्री सुरेश भोसले सर , श्री बाबुराव कानडे श्री कल्याण अनंत्रे आणि विद्यार्थी व काही पालकही उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *