जागतिक महिला दिनानिमित्त पलूस येथील शिक्षक महिलांचा अभिनव संकल्प* *आम्ही आपले वारसदार म्हणून घेतली प्रतिज्ञा*

लोकदर्शन 👉 राहुल खरात


जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज पलूस येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील पलूस केंद्रातील विविध शाळातील शिक्षिका,शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या, भारती कन्या प्रशाला येथील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनी आदिंनी मिळून एक अभिनव संकल्प केला. आम्ही तुमचे वैचारीक वारसदार म्हणून जगभरातील, भारतातील, महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या नावांचे बोर्ड आपल्या हातात घेऊन आम्ही तुमचे वैचारिक वारसदार म्हणून उत्तम काम करू, आदर्श जीवन जगू व देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी जरूर प्रयत्न करू अशी प्रतिज्ञा घेतली. यामध्ये,मदर तेरेसा, संत जनाबाई ,संत कान्होपात्रा ,संत मुक्ताबाई, संत मीराबाई, राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले ,फातिमा बीबी, संत मीरा साहेब ,झाशीची राणी लक्ष्मीबाई ,मेधा पाटकर ,लता मंगेशकर ,अरुणा असफ अली, गोदावरी परुळेकर, सुनीता विल्यम्स ,कल्पना चावला, बहिणाबाई चौधरी, सरोजनी नायडू ,इंदिरा गांधी ,शांता शेळके, पी टी उषा ,किरण बेदी,इंदीरा संत, सिंधुताई सपकाळ आदींच्या नावाचे फलक घेऊन घोषणा दिल्या.याप्रसंगी पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते मारुती शिरतोडे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास पलूस शाळा नं १ चे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, भारती कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संध्या भांगे ,पर्यवेक्षक कांबळे सर,लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर चे पर्यवेक्षक लक्ष्मण शिंदे,अजय काकडे, नारायण माळी, प्रशांत कुंभार, भंडारे सर, सोनाली चव्हाण ,वंदना सनगर, वैशाली कोळेकर सह अनेक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *