‘सोया कॉफी’ला महाराष्ट्र सरकारने प्रोत्साहन द्यावे : पद्माकर देशपांडे

By : Shankar Tadas

पुणे :
महाराष्ट्रात लाखों शेतकरी सोयाबीनची शेती करतात त्यांना भाव मिळत नाही. कारण त्यात पंधरा टक्के तेल असते तर उरलेली पेंड पशुखाद्य म्हणून वापरतो. मग त्यांना भाव कसा मिळेल. सोयाबीनचे दूध भेसळ म्हणून विकले जाते . आहारात सोयाबीन आले तर कुपोषणाचा प्रश्न सुटेल. सोयाबीनची कॉफी हा सर्व पदार्थात टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ आहे
हल्ली काही बचत गट व लघु उद्योग सोयाकाफी तयार करतात. त्यानी त्यांचे तंत्रज्ञान व यंत्रे विकसित केली आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांना शाबासकी दिली पाहिजे.
शेजारच्या कर्नाटकात कॉफी उत्पादक शेतकऱ्यांना कॉफीचा भाव किलोला होय किलोला एकशे एकतीस रुपये मिळतो. आणि कॉफी बोर्ड पुढच्या प्रक्रियेसाठी मदत करायला योजना राबवत आहे.
सोयाबीनच्या कॉफीसाठी असे बोर्ड हवे आहे.
सोयाबीनची कॉफी  caffeine free असते. हे जगाचे मार्केट पाचशे अब्ज डॉलरचे आहे. केवढी मोठी संधी आहे ही.
यातून लाखों रोजगार निर्माण होतील
आज आम्ही थोडेसे स्टार्ट उप उद्योजक कोणत्याही सरकारी मदतीशिवाय कसाबसा उद्योग करतो. कारण मार्केटिंगचे introduction चे खर्च मोठे आहेत.आपण soyacoffee आमदार कॅन्टीन मध्ये ठेवावी.
प्रत्येक जिल्ह्यात एक सोयाप्रक्रिया पथदर्शी प्रकल्प उभारला पाहिजे.
सोयाकॉफी साठी caffeine free coffee board स्थापन केले पाहिजे.
हा सोन्याचा दाणा आहे असे महात्मा गांधी म्हणत असत 🌒
जगात  सोया उत्पादनात आपला क्रमांक पाचवा असला तरी नॉन GMO मध्ये पहिला आहे.
ही जागतिक बाजाराची रोजगार निर्मितीची संधी साधणे महाराष्ट्र सरकार करू शकते
: पद्माकर देशपांडे
पुणे
Email soyasangh@gmail.com

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *