आमदार चषक कबड्डी स्पर्धेत विविध मान्यवरांचे सत्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या संकल्पनेतून राजुरा कल्ब राजुरा द्वारा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय राजुरा येथे आयोजित विदर्भ स्तरीय आमदार चषक २०२३ च्या कार्यक्रमात आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा तालुक्यात आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचे शाल श्रफळ आणि सन्मान सत्कार चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले
यात विवेक सावकार गोनपल्लीवार, भंगाराम तलोधी तह गोंडपिपरी, गोरगरिबांना मदत, अन्नदान, नेत्रदान करणारे, भंगारम तळोधी येथे लाखो किमतीची मौल्यवान जागा आरोग्य विभागाला दान केली. प्राचार्य डॉ. सत्यपाल कातकर, राजुरा, शैक्षणिक, कायदा समुपदेशक, मनोवैज्ञानिक, लेखक तथा गोरगरीब विद्यार्थीच्या शैक्षणिक हक्कासाठी लढणारे व्यक्तीमत्व, डॉ. शंकरराव बुरान राजुरा, गोरगरीबांसाठी मोफत मध्ये आरोग्य विषयक सेवा प्रदान करणारे व्यक्तीमत्व, पुंडलीक पाटील वडस्कर, सातरी तह राजुरा, गोरगरीबांसाठी आरोग्य विषयक सेवा करणारे व्यक्तीमत्व, महादेव धुर्वे महाराज, आसन तह कोरपना, रामदास ताविडे बाखार्डी, गेली १५ वर्षापासून गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक वृक्ष मित्र / स्वच्छतेचे पुजारी, मुत्था महाराज, विष्णू मंदिर माणिकगड किल्ला, विष्णु मंदिर माणिकगड किल्ला येथे 30-35 वर्षापासून | एकटे जंगलात राहून सेवा करीत आहेत., रामदास भोयर, महाराज, तोहोगव
अध्यात्मिक व धार्मिक कार्याच्या माध्यमातून समाज | जागृतीचे कार्य (अधश्रद्धा निर्मुलन), खुशाल पोचू हुडे, चिंचोली तह राजुरा, स्वतः चे जीव धोक्यात घालून पूरात अडकलेल्या बस मधील ३५ नागरिकांचे प्राण वाचवणारे व्यक्तीमत्व, रामदास रणवीर, मुकादमगुडा तह जिवती, समाजकार्य, मराठी अस्मितेसाठी गेली ४० वर्षापासून
सातत्याने झटनारे व्यक्तीमत्व, दत्ता तोगरे, जिवती, भजन व किर्तनाच्या माध्यमातून समाज कार्य व निरक्षरांना साक्षर करण्याच्या कार्य (साक्षरता अभियान), ह.भ.प. नामदेव रघुनाथ गुरुनुले (महाराज)(वनसडी तह कोरपना) व्यसनमुक्ती प्रबोधनकार, ह.भ.प. शंकर भेंडारे महाराज (माथा तह कोरपना) गुरुदेव सेवा मंडळच्या मार्फतीने समाज प्रबोधन कार्य, महादेव पांडुरंग भुसारी (वनसडी तह कोरपना) समाज प्रबोधनकार, राजय्या दुर्गय्या येल्लावार ( सोंडो तह राजुरा)
सर्व प्रकारच्या पिकांची लागवड करणारे शेतकरी (पिके कापूस, तूर, मिरची, भात, हरभरा, उन्हाळी मका, सोयाबीन, गहू) शेळीपालन, दिलेले लाभ – ठिबक संच, | तुषार संच, हरभरा, सोयाबीन, मसूर पीक प्रात्यक्षिके, फेरोमोन टॅप एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रण, आकाश नाथुजी पिकमुंडे प्रो कबड्डीचे खेळाडू इत्यादी सत्कार मूर्तींचा सन्मान करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सेवा कलश फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *