कोची एक समता – बंधूता जोपासनारे गांव. वयोवृद्ध नागरिक कोंडूजी जुलमे यांचा सत्कार

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :- गाव म्हणजे विविध विचारांनी प्रेरित असते म्हणून ” एक गाव बारा भानगडी” ही म्हण प्रचलित झाली असावी.परंतू काही गावांची वैशिष्ट्ये समाजहितासाठी वेगळी असतात, परंतु ती प्रकाश झोतात नसल्याने चर्चा होत नाही. असेच एक गाव “कोची”.
राजुरा मुख्यालया पासुन अवघ्या १५ कि.मी.अंतरावर व पाचगाव च्या पुर्वेस २कि.मी. कोची हे छोटेसे गाव आहे.साखरवाही ग्रामपंचायत मध्ये असलेल्या या गावात साधारणतः ३५ घराची वस्ती असून लोकसंख्या सुमारे १६० आहे.गावात पुर्णतः बौद्ध बांधवांची वस्ती असून शेती हा मुख्य व्यवसाय.गाव छोटे असले तरी महसुली व बऱ्याच काळापासून वसले आहे.येथे जि.प.ची वर्ग १ते४ शाळा असुन, अंगणवाडी केंद्र आहे.
समाज मनात साधारणतः एक असा गैरसमज आहे की, बौद्ध समाज बांधव मुर्ती पुजक नसुन ते इतर धर्म-पंथ-जातीच्या श्रध्दास्थानाचा आदर करीत नाही.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्याय,समता,बंधूंचा या संविधानिक मुल्याचे जतन करत येथिल समाज बांधवांनी एक आगळीवेगळी परंपरा जोपासली आहे.
गावात पुर्वी पासुन मारूती ची मुर्ती होती.ग्रामस्था कडून नित्य नेमाने पुजा आराधना केली जात होती.वयोवृध्दानी सांगितले आमच्या पुर्वजांनी कधी काळी मुर्ती मांडली.गावाचा रक्षक म्हणून श्रध्दा होती व ती आजही जोपासली जात आहे.काहींच्या मते काही वर्षांपूर्वी येथिल मारूतीची मुर्ती गोवरी गाव परिसरातील अज्ञातांनी चोरून नेली. त्या ठिकाणी दुसरी लहान मुर्ती स्थापन केली. कोची परिसरात १२-१३ वर्षांपूर्वी जलसंधारण कामे करण्यास एक एनजीओ कार्यरत होती.त्या संस्थेचे अध्यक्ष मोहन सातपुते भद्रावती यांनी ही सुंदर व आकर्षक मूर्ती आणून दिली. २०१२ मध्ये मुर्ती ची स्थापना करून छोटेसे स्लबचे मंदिर बांधले.मंदिर परिसराची नित्यनेमाने स्वच्छता व आराधना केली जाते.
विशेष म्हणजे या गावात पुर्णतः बौद्ध बांधव असुनही तेथे बौध्द विहाराचे बांधकाम केले नाही मात्र मारूती मंदिर बांधून व त्याची जोपासना करून देशाला न्याय,एकता,समता, बंधुता हा संदेश देत आहे.अलीकडे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जागा खरेदी करून बौद्ध विहाराचे काम सुरु केले.परंतू गाव लहान असल्याने निधी गोळा करण्यास अडचणी येत असल्याची भावणा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सामाजिक भावना जोपासनारे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णाजी भोयर,कळमना चे सरपंच नंदकिशोर वाढई, पाचगाव चे ग्रा.प.सदस्य बापुराव मडावी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गिरसावळे यांनी (२१जाने.)कोची गावाला भेट देऊन ग्रामस्थाप्रती सदिच्छा व्यक्त केल्या व गावातील वयोवृद्ध जेष्ठ नागरिक कोंडूजी जुलमे वय ८२ वर्षे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी गावचे पो.पा.सुभाषजी झाडे, साखरवाही चे पो.पा.हरिदासजी पहानपटे, प्रतिष्ठित नागरिक महेंद्र धोंगडे, केशवराव झाडे, बाबुराव वाघमारे,अभि कोडापे,वामन नमनकर, सिध्दार्थ वाघमारे, रविंद्र वाघमारे, प्रकाश वनकर,ग्रा.प.सदस्या माधुरी राजु जुलमे,सुकेसिनी झाडे, कांताबाई जुलमे,तुळशिराम जुलमे,राजु जुलमे,शंकर पिपरे, रमेश जुलमे,व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *