साईनगर येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी.

लोकदर्शन ÷ मोहन भारती

 

राजुरा :– श्री.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह साईनगर राजुरा येथे श्री. संत गाडगेबाबा यांची 146 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लटारु मत्ते, अध्यक्ष श्री.गुरुदेव सेवा मंडळ साईनगर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सूरेश बोंडे, रत्नाकर नक्कावांर, चंद्रशेखर चांदेकर, मनोहर बोबडे, सुनील बोढे, पुंडलिक उरकुडे, ऋषी निमकर, शंकर मडावी, अजय तगणपल्लीवार, प्रतीक कावळे, वेदांत कोहपरे, आरुषी चिंचोलकर आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबांच्या अज्ञान,अंधश्रद्धा व अस्वचछता यांनी बुरसटलेल्या समाजाला मार्ग दाखवणाऱ्या कृतिशील संत श्री गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आयोजन, संचालन व आभार प्रदर्शन राजकुमार चिंचोलकर यांनी केले, प्रास्ताविक मनोहर बोबडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here