नगर परिषदेच्या वतीने स्तनदा मातांना आरोग्य विषयक साहित्य वाटप।     

लोकदर्शन 👉 मोहन भारती


गडचांदूर,,
नगर परिषद, गडचांदूर येथील महिला व बालकल्याण समिती च्या वतीने 0 ते 1 वर्ष वयोगटातील बालके असणाऱ्या स्तनदा मातांना आरोग्य विषयक साहित्य व पौष्टिक सकस आहार चे वाटप 22 फेब्रुवारी ला करण्यात आले,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगराध्यक्षा सविताताई टेकाम होत्या,
प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी डॉ, विशाखा शेरकी, महिला व बालकल्याण समिती च्या सभापती सौ,अर्चना वांढरे, बांधकाम समिती च्या सभापती सौ,कल्पना निमजे,सौ,जयश्री ताकसांडे,सौ,वैशाली गोरे,सौ,मीनाक्षी एकरे, सौ,सुनीता कोडापे,सौ,किरण अहिरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र चे डॉ, घटे, डॉ, किनाके,अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ,येरमे होत्या,
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ, विशाखा शेरकी, यांनी प्रास्ताविक केले, याप्रसंगी डॉ, घटे, डॉ, किनाके, सभापती अर्चना वांढरे,सौ.कल्पना निमजे, पर्यवेक्षिका येरमे ,नगराध्यक्षा सविता टेकाम यांनी महिलांना बालकाची आरोग्य विषयक काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, संचालन व आभार प्रदर्शन अभियंता स्वप्निल पिदूरकर, यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी चरंनदास शेडमाके, अभियंता प्रीतिष मगरे,अमित निमकर,प्रमोद वाघमारे, सचिन खनके,हर्षद पिदूरकर, व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले,
कार्यक्रमात स्तनदा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here