विदर्भ महाविद्यालय जिवती येथे शिवजयंती कार्यक्रम थाटात साजरा ,                                                         

लोकदर्शन👉 प्रा. गजानन राऊत
9767584069

विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयात जयंती कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रम महाराजांच्या मूर्तीस माल्यार्पण व विधिवत पूजा करून करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता जिवती नगरपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य श्री ममताजी जाधव कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री गणाजी आडे,गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रमुख मेहबूबभाई शेख, शेतकरी संघटनेचे प्रमुख श्री पुरी महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाक्य आणि उपस्थित मान्यवरांनी माल्यार्पण करून शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. त्यांचे कर्तृत्व व पराक्रम सदैव मानवास प्रेरणा देत राहील असे मत मान्यवरांनी मांडले सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील प्रा. मंगाम प्रा. मुंडे प्रा. देशमुख, प्रा. तेलंग, प्रा. लांडगे, प्रा. पानघाटे प्रा. मस्‍कले प्रा. राऊत, प्रा. वासाडे श्री शिंदे, श्री वाकळे, श्री कांबळे, श्री गणपत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. गजानन राऊत
9767584069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here